Akola : राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे परदेशात जाऊन बसले आहेत. अशी टिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते (अजित पवार गट) अमोल मिटकरी यांनी मुंडेंची बाजू घेत, विजय वडेट्टीवारांना उत्तर दिले आहे. वडेट्टीवारांनी विचार करून बोलावे, असेही मिटकरी म्हणाले.
वडेट्टीवारांना खडसावले
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या बुद्धीची खरंच कीव करावी वाटते. कृषिमंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मुलीच्या पदवीदान समारंभ प्रसंगी अमेरिकेला गेले आहेत. एक बाप म्हणून ते गेले आहेत. बापाला त्याच्या मुलीचा अभिमान असतो. जसा शिवानी वडेट्टीवारांचा अभिमान विजय वडेट्टीवारांना आहे. तसाच धनंजय मुंडे यांनाही त्यांच्या मुलीचा अभिमान आहे. त्यांच्या मुलीचा सन्मान होत असताना, मुलीच्या भविष्याकरिता धनंजय मुंडे गेले असताना त्यांची मस्ती, त्यांचा माज अशा प्रकारची भाषा वडेट्टीवार यांनी करू नये. असे बोलून वडेट्टीवार स्वतः किती मस्तीखोर आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. वडेट्टीवारांनी स्वतःच्या तोंडाला लगाम लावावा. इतकेच नाही, तर सत्य परिस्थिती त्यांनी समजून घ्यावी. असे अमोल मिटकारी म्हणाले.
कृषिमंत्री धनंजय मुंडे संवेदनशील आहेत. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आस्था आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते 1 जून पासून कटीबद्ध असतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचेही निवारण कृषीमंत्री करतील. परंतु, स्वतःच्या मुलीच्या शिक्षणाचे राजकारण करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांच्या मेंदूची मला कीव आल्याशिवाय राहत नाही, असे मिटकरी म्हणाले. जर वडेट्टीवारांनी यानंतर पुन्हा मस्तीची भाषा केली, तर त्यांना तशाच भाषेत उत्तर दिल्या जाईल. असे अमोल मिटकरी यांनी विजय वडेट्टीवार यांना खडसावून सांगितले आहे.
Vijay Wadettiwar : संत्रे कुटुंबाच्या न्यायासाठी विधानसभेत आवाज उठवू
काय म्हणाले होते वडेट्टीवार..
“कृषीमंत्र्यांनी या महिन्यात बियाण्यांची, खतांची उपलब्धता याचा आढावा घ्यावा. मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांत 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला असून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे. पण ते परदेशात जाऊन बसले आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत ते परदेशात गेलेच कसे? असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते.
अशी भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे सांगून सरकार जनतेला, शेतकऱ्यांना मूर्ख बनवत आहे. दुसरीकडे, त्यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन 25,000 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या,” असा दावा वडेट्टीवार यांनी केला.