संपादकीय

MNS : ‘राज’ पुत्राचा विजय ही महायुतीची जबाबदारी

Raj Thackeray : 'हम जहां खडे होते है, वहासे लाइन शुरु होती है'

या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.

 BJP And MNS : सर्व सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा सीमित असतात. उगाच उंच उडण्याचे धाडस तो करत नाही. उंच भरारी मारण्याचे स्वप्नही तो पहात नाही. आपली आखलेली चौकट ओलांडण्याचा तो फारसा प्रयत्नही करत नाही. आपल्या जवळ जेवढे आहे, त्यातच तो समाधानी असतो. साधे सरळ जीवन जगणे त्याला आवडते. 

डोकेदुखी ठरणारे विषय सहसा तो टाळतो. स्वतःच्या मागे नसता व्याप आणि झंझट तो लावून घेत नाही. आपली क्षमता त्याला ठाऊक असते. त्याचा परीघ तो ओलांडत नाही. आपले घर, आपला परिवार नातेवाईक मित्र मंडळ यांच्यात तो रमतो. त्यामुळे ‘खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर हे पहले खुदा खुद बंदेसे पुछे बता तेरी रजा क्या है’ असा शेर म्हणताना तो दिसत नाही.राजकारणात वावरणाऱ्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट ठरवून करतात.

त्यांचे नियोजन चोख असते. मनात आणलेला विचार कृतीत आणण्याचा त्यांचा स्वभाव असतो. ते सतत संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. मिळालेली संधी ते सोडत नाहीत. काही मुरब्बी राजकारणी परिस्थितीचा वेध घेऊन स्वतःसाठी संधी निर्माण करतात. कोणत्या वेळेस कसे वागायचे, हे त्यांना वेळीच उमगते. वेळोवेळी आपल्या सोयीनुसार भूमिका बदलण्यात तर ते माहीर असतात.

चालक-मालक एक 

महाराष्ट्रातील पक्ष काही मोजक्या व्यक्तिंच्या अधिपत्याखाली चालतात. त्यांचे चालक-मालक तेच आहेत. काहींना असे पक्ष कौटुंबिक वारसा म्हणून मिळाले आहेत. काहींनी ते स्वबळावर, कर्तृत्वावर स्थापन केले आहेत. जन सामान्यांच्या पाठींब्याने ते आपले भक्कम अस्तित्व टिकवून आहेत. या पक्षांचे प्रमुख गर्भ श्रीमंत आहेत. सर्व सुखांची रेलचेल आहे.महालात राहणारी ही मंडळी आपल्या ताकदीवर निवडणूक लढवून जनतेचे कैवारी होण्याची तयारी करीत आहेत.अशांसाठी निवडणूक लढविणे आणि ती जिंकणे काही कठीण नसते. 

‘हम जहां खडे होते है, वहासे लाइन शुरु होती है’ हा डायलॉग त्यांना हमखास लागू पडतो. आता माहीम या विधानसभा मतदारसंघाचेच बघा. तिथून ‘राज’पूत्र निवडणूक लढवतो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला मुलगा अमित याला राजकारणात सेटल करायचे आहे. वडील या नात्याने ते सर्व काही सुरळीत जूळवून आणत आहेत. माझ्या मुलाचा विजय ही महायुतीची जबाबदारी असा हा ‘फिट’मामला आहे. या मतदारसंघात महायुतीने शिंदे गटाच्या स.दा . सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. पण सर्व पाठबळ अमित ठाकरे याच्या मागे उभे करण्यात येत आहे.

सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे त्यांना लवकरच उमजेल. सर्व काही व्यवस्थित होइल. अशी आशा सर्वच बाळगून आहेत. या मतदारसंघात उद्धव सेनेने उमेदवार दिला आहे. राजकारणात प्रभावी, धनाढ्य, लोकांची चलती आहे. नेते मंडळी आपली मुलं आपल्या शक्ती सामर्थ्यावर राजकारणात कशी येतील याचा गांभीर्याने विचार करत आहेत. त्यासाठी ते आपल्या खास नीतीचा वापर करतांना दिसतात. 

खुल जा सिम सिम

अलिकडे राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री भाजपचा होईल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे. आता भाजपवर येवढी स्तुतीसुमने उधळल्यावर आपल्या मुलासाठी देवेंद्रजी नक्कीच ‘खुलं जा सिम सिम’ करतील अशी आशा नव्हे विश्वास ते बाळगून आहेत. निवडणूक जिंकण्यास जेव्हा सशक्त पाठबळ नसते तेव्हा काहीच उरत नाही. तेव्हा स.दा. सरवणकर यांनी निवडणूक लढवली, तरी त्यांना फारसे काही साध्य होईल असे वाटत नाही. निवडणुकीत संख्याबळाचे पाठबळ मोलाचे असते.

Akola West : ठरलं! भाजपकडून हरीशभाईशी बोलणार.. 

ताकद राज पुत्राच्या दिमतीला

माहीममध्ये सारी ताकद राज पुत्राच्या दिमतीला आहे. पक्षाच्या पाठबळावर विजय सुनिश्चित होत असतो. पक्षाचे पाठबळ नसताना स्वबळावर निवडून येणे यासाठी तेवढ्या ताकदीचा उमेदवार हवा असतो. अन्यथा तो निव्वळ हवेचा फुगा ठरतो. राजकीय नेते काही निर्णय दूरगामी विचार करून घेतात. बेरजेचे गणीत आधीच ठरलेले असते. असते एकेकाचे भाग्य. महालात राहणाऱ्या राजपुत्राचे भाग्य सांगायला ज्योतिषी लागत नाही. सारे ग्रह व्यवस्थित जुळून आणले जातात. अडथळ्यांच्या ग्रहांची व्यवस्थित शांती केली जाते. हे सारे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण हे ‘राज’कारण आहे. इथे फालतू गोष्टींची कारणे विचारायची नसतात.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!