POK : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील रॅलीत (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील शांततापूर्ण परिस्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील शांततापूर्ण परिस्थिती आणि पीओकेमध्ये सुरू असलेली निदर्शने यांच्यातील फरक अधोरेखित केला. “2019 मध्ये सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर, काश्मीरमध्ये शांतता परत आली आहे. पण आता आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने पाहतो आहोत. पूर्वी येथे आझादीचे नारे ऐकू येत होते, आता तेच नारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऐकू येतात, दगडफेक होत आहे,” असे शाह म्हणाले.त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीर आता निदर्शने आणि स्वातंत्र्याच्या घोषणा दिली जात आहे. पीओकेमध्ये महागाईबाबत हिंसक निदर्शने सुरू आहेत
राहुल गांधी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा
काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले, ‘मणिशंकर अय्यर यांच्यासारखे काँग्रेस नेते म्हणतात की, त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्याने असे करू नये. मला असे म्हणायचे आहे की तो भारताचा एक भाग आहे आणि आम्ही तो (पीओके) घेऊ.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पीओकेमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि भारत तो घेईल. निशाणा साधत ते बोलत होते