महाराष्ट्र

Prakash Ambedkar : उज्ज्वल निकम यांच्यावर कोणाचा दबाव, स्पष्ट करा!

Ujjwal Nikam : प्रकाश आंबेडकरांचे निकम यांना पुन्हा आवाहन!

Ambedkar Vs Nikam : उज्ज्वल निकम यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला, व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर दबाव असेल. पण, आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावे की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का ? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलिस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीड करू नका. अशा सूचना दिल्या होत्या का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला.

ॲड. आंबेडकर म्हणाले, जसे परकियांकडून देशाच्या एकतेला धोका आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात, या देशात जयचंद किती निर्माण झाले आणि भारताला स्वतंत्र अस्तित्व गमवावं लागलं त्याची उदाहरणे त्यांनी दिले आहेत. मी उज्ज्वल निकम यांना आवाहन करतो की, 26/11 मध्ये काय घडलं आहे ? हे लोकांना प्रामाणिकपणे सांगावे. आपण सांगितलेली व्यक्ती आणि संघटना या देशात जयचंदचे काम करणार का, याबद्दल जनता निर्णय घेईल.

Prakash Ambedkar : देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

तो संबंध भाजप का उलगडत नाही

26/11 चा हल्ला झाला. त्या हल्ल्यामागील एक हल्ला आहे. ज्याने कोणी हल्ला केला त्याला माहिती होतं की, पाकिस्तान हल्ला करणार आहे. याचा अर्थ त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. तो संबंध भाजप का उलगडत नाही? असा प्रश्न आंबेडकर यांनी भाजपला विचारला.

निकम यांना जनतेने विचारावे

तसेच, जनतेने उज्ज्वल निकम यांना विचारले पाहिजे की, तुम्ही राष्ट्राशी प्रामाणिक नाही तर आम्ही तुम्हाला मतदान का करावे? असाही सवाल देखील आंबेडकर यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!