Maharashtra Legislature : विधान परिषदेच्या सभागृहात 2 जुलै रोजी गोंधळ पाहायला मिळाला. भाजप आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात शिवीगाळ झाली. त्यामुळे विधान परिषदेत वादग्रस्त वातावरण निर्माण झाले. दोघांमधील वाद विकोपाला गेला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित केल्यानंतर अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हेंना पत्रामार्फत दिलगिरी व्यक्त केली.
विधान परिषदेच्या सभापतींच्या या कारवाईवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांवर षडयंत्र रचून निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. याचवेळी त्यांनी दानवे यांनी केलेल्या शिवीगाळीबद्दल राज्यातील सर्व माता भगिनींची माफी मागितली.
अधिकार हिरावला
शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन खूप महत्वाचे असते. त्यांच्या समस्यांवर बोलणे माझा अधिकार आहे, असे दानवे म्हणाले. हाच अधिकार हिरावून घेत असाल, तर हे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले. दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेत्यांची भूमिका म्हणजे, जनतेचा आवाज असतो. याच आवाजाला दाबत असाल, तर ते सुद्धा चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दानवे म्हणाले की, जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या दरबारात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यात आले. ज्या प्रकारे निलंबन करण्यात आले, या प्रकराला आक्षेप आहे. माझ्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सर्व प्रकार मी व्हॉट्सॲपवर बघीतला. शिवसेना कार्यकर्त्यांचे हे सर्व स्वाभाविक वर्तन असल्याचे त्यांनी सांगितलं.
भारतीय जनता पार्टीला लोकसभेत दणका बसला तरीही त्यांचे डोके ठिकाणावर आलेले नाही, असे प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. दानवेंच्या निलंबनावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, अंबादास दानवे यांनादेखील बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती.
Monsoon Session : देवाभाऊ बहिणींना म्हणाले, एजंटपासून सावधान !
मात्र कुणालाही बोलू दिलं नाही. एकप्रकारे ठरवून, षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्यांना निलंबित करण्यात आले. असं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असेल. सगळा अन्याय महाराष्ट्रातील जनता डोळे उघडून पाहत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.