महाराष्ट्र

Ambadas Danve : राज्याच्या हितासाठी संघर्षाची नव्हे तर सहकार्याची भूमिका !

Legislative Council : अंबादास दानवेंनी दिले नव्या सभापतींना आश्वासन

महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेशा व्यक्तीमत्त्वाची निवड विधान परिषदेच्या सभापतिपदी करण्यावर सर्वांनी एकमत केलं. विरोधी पक्षानेही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. आपली कारकीर्द येणाऱ्या काळात चांगली व राज्याच्या प्रगतीची जावो, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिले.

आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज आहात. आज तुम्ही या सर्वोच्च पदी बसल्याचा सर्वात जास्त आनंद तुमच्या माऊलीला होत असेल, असे म्हणत दानवे यांनी शिंदे यांच्या सभागृहात बसलेल्या आईच स्वागत केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रा. राम शिंदे यांच्या राजकिय कारकीर्दीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. तसेच जलयुक्त शिवार योजनेत मंत्री झाल्यावर केलेल्या कामाचंही कौतुक केलं.

आपल्या कामात आमचं पूर्ण सहकार्य राहील. सभागृहात डाव्या बाजूला बसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांवर जास्त लक्ष ठेवा, अशी विनंती दानवे यांनी सभापती यांना केली. आपल्या राजकीय जीवनात जरी संघर्ष राहिला असला, तरी विरोधी पक्ष राज्याच्या हितासाठी संघर्षाची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले.

DCM Ajit Pawar : अजित पवारांनी हाती घेतला कांद्याचा प्रश्न !

विधान परिषदेचे नवे सभापती कोण, याच्या चर्चा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चांगल्याच रंगल्या होत्या. पण काल (18 डिसेंबर) प्रा. राम शिंदेच सभापती होतील, हे स्पष्ट झाले होते. कारण त्यांच्या विरोधात कुणी अर्जत दाखल केला नव्हता. सभापती पदाची निवड ही बिनविरोध होणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती खंडीत होऊ नये, अशी भूमिका विरोधी पक्षानेही घेतली होती. विरोधकांच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. प्रा. राम शिंदे यांनी निवड झाल्यानंतर आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि सभापतींना सहकार्य करू, असा संदेश विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाषणातून दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!