महाराष्ट्र

Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया लोकसभेत उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Bhandara-Gondia Constituency : नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाचा लागणार कस

Political News : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारांपेक्षा त्यांना निवडणुकीत उभे करणाऱ्या नेत्यांना टेंशन अधिक आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची निवडणूक मानली जात आहे. दरम्यान महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना निवडून आणण्यासाठी प्रफुल पटेल, तर महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते डॉ. प्रशांत पडोळे यांना निवडून आणण्यासाठी नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Nana Patole : मला अडीच महिन्यांपासून ‘टॉर्चर करत आहे

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत चालली आहे. महायुतीने पुन्हा भाजपचे खासदार सुनील मेंढे यांना संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने डॉ. प्रशांत पडोळे या नव्या चेहऱ्याला रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीत उमेदवार लढत असले तरी खऱ्या अर्थाने वजनदार नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्या अनुषंगाने वजनदार नेते राज्यसभा खासदार प्रफुल पटेल व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी आजी-माजी आमदारांनाही अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे.

पारडे जड

खासदार प्रफुल पटेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) महाआघाडीपासून विभक्त होऊन महायुतीला समर्थन केले आहे. तर दुसरीकडे तब्बल 25 वर्षानंतर काँग्रेस या लोकसभा क्षेत्रात निवडणूक लढवीत आहे. पटोले आणि पटेल या दोन्ही नेत्यांचे पारडे समसमान मानले जाते. त्यामुळे ही निवडणूक वजनदार नेत्यांच्या अस्तित्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. प्रशांत पडोळे या नव्या चेहऱ्याला रिंगणात उतरवले आहे. तर महायुतीतील भाजपकडून खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. प्रशांत पडोळे हे गोंदिया जिल्ह्यासाठी नवखे ठरत आहेत तर दुसरीकडे भाजप खासदार सुनील मेंढे यांची एक टर्म झाली असली तरी त्यांची कार्यप्रणाली जिल्ह्यासाठी पाहिजे तेवढी प्रभावी ठरली नाही. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांची लढाई होत असली तरी यांच्या नावापेक्षा वजनदार नेत्यांच्याच अस्तित्वाची चर्चा सुरू झाली आहे. खासदार प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन्ही वजनदार नेते भंडारा-गोंदिया हा मतदार संघ काबीज करण्यासाठी कोणती खेळी खेळणार, याकडे राजकीय तज्ज्ञांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!