Buldhana: 18 वी लोकसभा निवडणूक आता एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली असून, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवशी बुलढाणा लोकसभेसाठी 17 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. दरम्यान आतापर्यंत २९ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले असून, प्रमुख पक्षांसह १२ अपक्षांचा यात समावेश आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीतर्फे प्रा. नरेंद्र खेडेकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याव्यतिरिक्त सहा जणांनी अपक्ष दाखल केले. अर्ज अपक्ष म्हणून आजपर्यंत गजानन धांडे, ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील, श्याम बन्सीलाल शर्मा, अशोक वामन हिवाळे, नामदेव दगडू राठोड, दिनकर सांबारे, अॅड. सय्यद मुबीन सय्यद नईम, रविकांत चंद्रदास तुपकर, रेखा पोफळकर, संदीप रामराव शेळके, नंदू लवंगे, उद्धव ओंकार आटोळे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान सोशालिस्ट पार्टी इंडियातर्फे मच्छिंद्र शेषराव मघाडे, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटिककडून दीपक भानुदास जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर) तर्फे संतोष भीमराव इंगळे, भीमसेनेकडून विकास प्रकाश नांदवे, बहुजन संघर्ष सेनेतर्फे बाळासाहेब रामचंद्र इंगळे, बसपाकडून गौतम किसनराव मघाडे, बहुजन समाज पार्टीकडून विलास शंकर तायडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून माधवराव सकाराम बनसोडे यांनी ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.दुसरीकडे यापूर्वी महायुतीकडून शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड यांनी, तर भाजपकडून माजी आ. विजयराज शिंदे, बहुजन मुक्ती पक्षाकडून प्रताप पंढरीनाथ पाटील, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक महंमद हसन इनामदार, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिककडून सूमन मधुकर तिरपुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान प्रमुख पक्षांच्या काही उमेदवारांनी अपक्ष म्हणूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने अर्ज दाखल केलेले आहेत. असे एकूण २९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ५ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होईल.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी 5 जणांनी 5 अर्जाची उचल केली. दरम्यान तर 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत 62 जणांनी 137 अर्जाची उचल केली होती. यातील 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आज गजानन जर्नादन धांडे – अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम पाटील – अपक्ष, सचिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, दिपक भानुदास जाधव पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटीक, शाम बन्सीलाल शर्मा – अपक्ष, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, संतोष भिमराव इंगळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, दिनकर तुमाकार संबारे – अपक्ष, विकास प्रकाश नांदवे – भिमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – बहुजन संघर्ष सेना, गौतम किसनराव मघाडे – बसपा, विलास शंकर तायडे – बहुजन समाज पार्टी, ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम – अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी या उमेदवारांनी आज नामांकन अर्ज दाखल केले.
याआधी संजय रामभाऊ गायकवाड – शिवसेना, विजयराज शिंदे – भाजप, प्रतापराव जाधव – शिवसेना, रविकांत चंद्रदास तूपकर – अपक्ष, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सूमन मधुकर तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, संदीप रामराव शेळके अपक्ष, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
छाननीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होण्यास मदत
■ ५ एप्रिल रोजी नामांकन अर्जाची छाननी होणार आहे. ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
■ प्रत्यक्षात छाननीमध्ये २९ पैकी किती जणांचे अर्ज बाद होतात. त्यानंतर ढोबळमानाने लढतीचे चित्र स्पष्ट होईल, मात्र ८ एप्रिल नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यादिवशी जिल्ह्यातील लढतीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल.