महाराष्ट्र

Gondpipari President : बिलावर स्वाक्षरीसाठी आर्थिक मागणी 

Construction Work : कंपनीच्या महिला कर्मचारी वनिता संगमवार यांचा नगराध्यक्षांवर आरोप 

Blame Of Corruption : महिला शक्ती व्यवस्थेमध्ये आल्या की, व्यवस्थेचे स्वरूप बदलायला वेळ लागत नाही, असे म्हणतात. महिला शक्ती शासकीय कामात असेल तर भ्रष्टाचारालाही मोठ्या प्रमाणात आळा बसतो, असही बोलले जाते. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात थेट महिला नगराध्यक्षांनीच एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या महिलेलाच कामाच्या बिलावर स्वाक्षरीसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलाही भ्रष्टाचारामध्ये गुंतायला लागल्यात की काय, अशी शंका निर्माण होत आहे.

गोंडपिपरी नगरपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिल नगराध्यक्ष सविता कुलमेथे यांच्याकडे सादर केली. या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी सविता कुळमेथे यांनी पैशाची मागणी केल्याची तक्रार पायल कन्स्ट्रक्शनच्या वनिता संगमवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी (SDM) डॉ. अपूर्वा बसू, गोंडपिपरी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी (Chief Officer) विवेक चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

प्रशासनात खळबळ

पैशांची मागणी केल्याच्या या प्रकरणामुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता शासकीय पातळीवर नेमकी काय कारवाई केली जाईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंडपिपरी नगरपंचायतअंतर्गत वार्ड क्रमांक नऊ व दहामधील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट पायल कन्स्ट्रक्शनला मिळाले होते . हे काम पायल कन्स्ट्रक्शनने पूर्ण केले. या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कामाचा दर्जाही उत्कृष्ट असल्याचा शेरा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी फाइलवर दिला.

काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीने गोंडपिपरी नगरपंचायतकडे बिल सादर केले. विविध टेबलवरून ही फाइल थेट नगराध्यक्ष सविता कुलमेथे यांच्या टेबल वर पोहोचली. परंतु नगराध्यक्ष सविता कुलमेथे यांनी या फाइलवर सही करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. असा थेट आरोप आरोप पायल कन्स्ट्रक्शनच्या वनिता संगमवार यांनी केला आहे. आरोप केल्यानंतर वनिता संगमवार थांबल्या नाहीत. त्यांनी यासंदर्भात स्थानिक उपविभागीय अधिकारी आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे.

कामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी पैशाची मागणी थेट नगराध्यक्षांकडूनच व्हावी, याबाबत आता विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पायल कन्स्ट्रक्शनच्या वनिता संगमवार यांनी मात्र कामाचे बिल देण्यात यावे व योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणासंदर्भात गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष सविता कुळमेथे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुळमेथे म्हणाल्या, 14 ऑगस्टला आपल्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आपण बिलावर स्वाक्षरी केलेली नाही. करण्यात आलेले काम नगरोत्थान निधीअंतर्गत करण्यात आहे. आपण पदावर असेपर्यंत हा निधी आलेला नव्हता. आता हा निधी आलेला आहे. परंतु आपण सद्य:स्थितीत अविश्वास प्रस्तावावर चौकशी सुरू असल्याने स्वाक्षरी करू शकत नाही. भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!