महाराष्ट्र

Legislative Council : भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांचा विजय 

BJP : महाविकास आघाडीला मोठा धक्का

Mahayuti : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (ता. 11) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने विधानसभेच्या 11 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसला एक जागा मिळाली.शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचाही विजय झाला आहे. तर अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांचाही विजय झाला आहे.विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके विजयी झाले

आम्हाला पाच मते अधिक मिळाली – अजित पवार

विधान परिषद निवडणुकीत अजित पवार गटाकडे 42 मते होती पण त्यांच्या दोन उमेदवारांना एकूण 47 मते मिळाली आहेत. त्यांनी काॅंग्रेसची 5 मते फोडली असण्याचा अंदाज आहे.याशिवाय काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. आपल्या पक्षाचे तीन-चार मतं फुटतील, असं कैलास गोरंट्याल उघडपणे म्हणाले होते.आम्हाला पाच मतं अधिक मिळाली, त्यामुळे त्या पाच आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानतो अजित पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी आणि तिकीट कापलेल्या कृपाल तुमाने यांना एकनाथ शिंदेंनी आता विधानपरिषदेची संधी दिली होती. त्यात त्यांनी आपला विजय मिळवला आहे.

एकूण 12 उमेदवार रिंगणात 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत सर्व 274 आमदारांनी शुक्रवारी मतदान केले. राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी निर्धारित 4 वाजेपर्यंत सर्व 274 सदस्यांनी मतदान केले. तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर मतदान करण्यासाठी विधानभवनात पोहोचले होते.

Legislative Council : डॉ. परिणय फुकेंच्या रूपाने ओबीसींना पुन्हा मिळाला आवाज ! 

काँग्रेस आणि शिवसेना या विरोधी पक्षांनी गायकवाड यांना मतदान करू देण्यावर आक्षेप घेतला होता. काँग्रेस पक्षाच्या पत्रावर कारवाई करत निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून उत्तर मागितले होते. अखेर गायकवाड यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली.

विजयी उमेदवारांची यादी

भाजप

1. योगेश टिळेकर

2. परिणय फुके

3. पंकजा मुंडे

4. अमित घोरखे

5. सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी (अजित पवार)

1. शिवाजीराव गर्जे

2. राजेश विटेकर

काँग्रेस

1. प्रज्ञा सातव

शिवसेना (एकनाथ शिंदे)

1. भावना गवळी

2. कृपाल तुमाने

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!