महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : कट्टरवादाला मतदान न करण्याचे आवाहन 

Assembly Election : मुस्लिम उमेदवारांनी माघार घेतल्याने नाराजी 

Prakash Ambedkar : अकोला जिल्ह्यात स्वतःहून उमेदवारी मागणाऱ्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला धोका दिला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून डॉ. झिशान हुसेन यांनी काँग्रेसच्या साजिद खान पठाण यांच्या विरोधात ऐनवेळी माघार घेतली. वंचित सोबत असलेल्या काही मुस्लिम मतदारांनी देखील तडजोडीची भूमिका घेतली. हा धोका झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी ला मोठा धक्का बसला आहे. अकोल्यात वंचितने थेट साजिद खान पठाण यांच्या विरोधात मतदारांना आवाहन करणारे पत्रक जाहीर केली आहे. 

दंगलखोर उमेदवार..

नाव न घेता वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, दंगलखोर उमेदवाराला मतदान करू नका. डॉ. झिशान हुसेन यांनी यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. त्यानुसार पक्षाने त्यांना संधी दिली. परंतु त्यांनी अखेर धर्माच्या राजकारणासाठी चुकीच्या माणसाला पाठिंबा दिला आहे. खुनाचा गुन्हा असलेल्या उमेदवाराला मतदान करू नका, असे आवाहन करणारे पत्र वंचित बहुजन आघाडीने प्रकाशित केले आहे.

भाजपची अडचण 

अकोला जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवारांनी माघार घेतली आहे. काँग्रेसला विजयी करण्यासाठी मुस्लिम समाजातील काही संघटनांनी मध्यस्थी केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात असलेल्या जवळपास सर्वच मुस्लिम उमेदवारांनी माघार घेतली आहे. मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला यंदा मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. मुस्लिम समाजाचा भाजप आणि महायुतीला प्रखर विरोध आहे. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढवत असलेल्या जवळपास सर्वच मुस्लिम उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे.

Chandrapur : सहा मतदारसंघात आता 94 उमेदवार 

निर्णय जाहीर

मुस्लिम समाजाकडून कोणाला मतदान करायचे याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यानुसार मुस्लिम समाज यंदा काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी तयार झाला आहे. मात्र पश्चिम विदर्भातील अनेक जागांवर महायुती समोर मोठा पेचप्रसंग आहे. अनेक ठिकाणी असे उमेदवार रिंगणात आहेत जे भाजपचं मत विभाजन करणार आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजप आणि महायुतीसाठी अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक ठिकाणी नेत्यांना अपयश आले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मार्ग खडतर राहणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी करून करण्यात आलेल्या आवाहनाला मुस्लिम समाज किती प्रतिसाद देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सर्वच मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतं काँग्रेसची जमेची बाजू ठरणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!