महाराष्ट्र

Akola : ‘इम्पोर्टेड’ पालकमंत्री ‘एक्सपोर्ट’ करावाच लागणार

Assembly Election : राधाकृष्ण विखे पाटील यांचे ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ कायमच

BJP News : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. भाजपची ‘होमपीच’ असलेल्या विदर्भातच दयनीय अवस्था झाली आहे. विदर्भातील केवळ दोनच जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे. अशात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशात मंत्रिमंडळातील फेरबदलाची शक्यता फारच कमी आहे. परंतु ‘डॅमेज कंट्रोल’साठी महायुती काही ठिकाणी हा निर्णय घेऊ शकते असे सांगण्यात येत आहे. अशात अकोला जिल्ह्याला देण्यात आलेले ‘इम्पोर्टेड’ पालकमंत्री ‘एक्सपोर्ट’ करून स्थानिक नेत्याला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असतानाही अकोल्यात ‘इम्पोर्टेड’ पालक मंत्रीच होते. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. परंतु पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात कडू यांनी अकोल्याशी मधूर संबंध निर्माण केलेच नाही. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. महायुतीचे सरकार आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अकोल्याचे पालकत्व आले. कामाच्या बाबतीत फडणवीस यांचा वेग ‘वंदे भारत’ पेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जाते. परंतु या वेगाचा फारसा उपयोग अकोल्याला झाला नाही.

पाटलांकडे जबाबदारी

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील ऊर्जा, गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र, राजशिष्टाचार अशी खाती आहेत. महायुतीचे सरकार आले तेव्हा ते सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यावरील कामाचे ‘व्होल्टेज’ वाढले. अशात उगाच ‘शॉर्ट सर्किट’ नको म्हणून त्यांनी अकोल्याचे पालकमंत्रिपद सोडले. या पदावर राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली. पण त्यांनीही बच्चू कडू यांचाच कित्ता गिरवला. अकोल्याशी ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’च ठेवली. अनेक पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये निदान ‘झेंडा टू झेंडा’ कार्यक्रमापुरते तरी दिसतात. पण विखे पाटील झेंड्याला सलामी देण्यापुरतेही अकोल्यात आले नाही. अपवादात्मक परिस्थिती वगळली तर त्यांचे फारच कमी दौरे अकोल्यात झालेत.

दुरून डोंगर साजरे

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकमंत्री झाल्यावर अकोल्यात बैठक घेतली. पण या बैठकीला देखील ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनेच उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे तक्रारी घेऊन कोणालाही दाद मागता आली नाही.

BJP Politics : भाजप नेत्याचा आरोप, हा मृत्यू नसून हत्या आहे

भारतात ब्रिटिशांची सत्ता इंग्रजांची राणी इंग्लंडमध्ये बसून कारभाराचा गाडा हाकायची. अगदी तशीच परिस्थिती अकोल्याबाबत कायम आहे. त्यामुळे स्थानिक नेता, ज्याला जिल्ह्याच्या समस्यांची जाण आणि ज्ञान दोन्ही आहे, अशाला आता पालकमंत्रिपद देणे गरजेचे आहे.

कोणाचे पारडे जड?

महायुतीचा विचार केल्यास अकोल्यात भाजपचे चार आमदार आहेत. यातील रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे हे विधानसभेचे सदस्य आहेत. वसंत खंडेलवाल ते विधान परिषदेचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अमोल मिटकरी हे देखील विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे स्थानिक पालकमंत्री नियुक्त करायचा असल्यास यापैकी कोणतेही एक नाव सरकारला निश्चित करावे लागणार आहे.

या नावांपैकी आमदार मिटकरी यांनी महाविकास आघाडीसोबत असताना भाजपवर सडकून टीका टिप्पणी केली आहे. अलीकडेच त्यांनी अजित दादा आणि प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावे असे विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपचे पटत नाहीये असा संदेश गेला. त्यामुळे मिटकरींच्या नावाला सर्व सहमती होईल असे वाटत नाही. आमदार वसंत खंडेलवाल हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक आहेत. व्यापारी वर्गात त्यांचा दांडगा संपर्क आहे. पण त्यांचे नावही पालकमंत्री पदासाठी फायनल होईल अशी शक्यता कमीच आहे. हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे यांच्या बाबतही अशीच परिस्थिती आहे.

एकूण परिस्थितीचा विचार केला जर अकोल्यातील भाजपमध्ये सध्या एकाच नेत्याचे पारडे जड आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे. सावरकर प्रदेश कार्यकारिणीवरही आहेत. भाजपच्या वटवृक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी त्यांनी कामही केले आहे.

Sudhir Mungantiwar : ‘योद्धा वही हैं बड़े, जो हर हाल में लड़े’

‘वॉरीयर्स’ची फौज उभी केली. अकोला लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांना सोपविण्यात आली होती. अनुप धोत्रे यांच्या विजयात सावरकर यांचा मोठा वाटा आहे. सावरकर-धोत्रे विरोधी गटाने निवडणुकीत काहीच काम केले नाही. त्याची तक्रारही झाली आहे. त्यामुळे अकोल्यातील सर्व नेत्यांचा विचार करता सद्य:स्थिती तरी त्यांचे पारडे जडच आहे

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!