महाराष्ट्र

Akola BJP : त्यापेक्षा साजिद खानलाच भाजपमध्ये घ्यावे

Akola West : भाजपच्या नेत्यांकडून नेत्यांजवळ रोखठोक भूमिका

Great Resentment : आमदार गोवर्धन शर्मा यांच्यानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपला सक्षम उमेदवाराचा शोध आहे. यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. अलीकडेच भाजपने उमेदवारांची नावे बंद पाकिटातून मागविली. या मतदानप्रक्रियेत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘पाकिटमारी’ केली. पक्षाशी संबंध नसलेल्या लोकांकडून मतदान करून घेतल्याचा आरोप या नेत्यावर होत आहे. साम, दाम, दंड, भेट, लोटांगण, धनशक्ती, चाटूगिरी असे सगळे ‘हथकंडे’ अंगीकारत या नेत्याने उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. 

अकोल्यातील भाजपमधून या नेत्याच्या नावाला प्रचंड विरोध आहे. हिंदुत्वाचा बुरखा पांघरून या नेत्याने हिंदुत्वाच्या विरोधातच काही निर्णय घेतल्याची तक्रार आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे. गुंडगिरी, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांसोबत या नेत्याची पार्टनरशिप असल्याचा आरोपही तक्रारीदरम्यान झाला आहे. विधानसभा पोटनिवडणूक जाहिर होण्यापूर्वी काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपेन साजिद यांच्या विरोधात ‘दंगलीचा आरोपी’ असे नमूद करीत प्रचार केला होता. मात्र आता भाजपमधून उमेदवारीसाठी जंगजंग पछाडणाऱ्या नेत्याना अनेक स्थानिकांनी ‘भाजपमधील साजिद’ असे नाव देऊन टाकले आहे.

फायदाच काय

‘भाजपमधील साजिद’ला विधानसभा निवडणुकीत उमदेवारी दिली तर पक्षातील सगळेच काम करतील. हे काम महायुतीचं सरकार राज्यात आणण्यासाठी असेल. पण आमदार झाल्यावर हा नेता आपली साजिदगिरी करेल असा गंभीर आरोप स्थानिक नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आला आहे. त्यासाठी अनेक पुरावे, कागदपत्र, फोटोही दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे हा नेता ‘स्लीपर सेल’ आहे असाही दावा काहींनी केला आहे. त्यामुळे अशा नेत्याला तिकिट देण्यापेक्षा भाजपने थेट साजिद खान पठाण यांनाच पक्षात घावे. तसे करायचे नसेल तर प्रसंगी भाजपने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारच देऊ नये, असे वरिष्ठांना भेटणाऱ्या नेत्यांनी नमूद केले.

अकोला भाजपमधील या नेत्यांपैकी काही जण नुकतेच नागपुरात येऊन गेले. काही मुंबईला गेले. काहींनी तर नागपूर व्हाया दिल्लीपर्यंत जाता येते का, याचा प्रयत्न चालविला आहे. वरिष्ठ नेत्यांची भेट घेणाऱ्या या स्थानिकांनी काही नावांचा पर्यायही सुचविला आहे. यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण ‘स्लीपर सेल’ नको असा परखड विरोध व्यक्त झाला आहे. आज, आता, लगेच काही सांगता येणार नाही असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संताप व्यक्त करणाऱ्यांना सांगितले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही तेवढी देण्यात आली आहे.

विचारपूर्वक निर्णय

लोकसभा निवडणुकीत भाजपला मनमानी पद्धतीने उमेदवार दिल्यामुळे मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा भाजप ताकही फुंकून पिणार आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे प्राबल्य असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. महायुतीचा हा फार्मूला ठरला आहे. अकोला पश्चिममधून भाजप व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट देखील इच्छुक आहे.

काँग्रेसकडून (Congress) साजिद खान पठाणे यांचे नाव जवळपास निश्चितच आहे. साजिद यांच्या नावाला काँग्रेसमधून कितीही विरोधी झाला तरी पूर्वीच्या निवडणुकीत मिळालेली अडीच हजार मतं आणि त्यांच्या पाठिशी असलेले मुस्लिम तरुण मतदार यामुळे काँग्रेस नेत्यांचे झुकते माप त्यांनाच आहे. त्यामुळे जो जिंकण्याची ताकद ठेवतो, त्यालाच तिकिट असाच यंदा महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांचा कल राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसने काय करायचं हे ठरवून ठेवलं आहे. आता निर्णय फक्त महायुतीला घ्यायला आहे, की अकोला पश्चिमचं काय करायचं.

Akola West : विजयाची हमी असल्याने काँग्रेसची पहिली पसंती साजिद खान यांनाच

पराभवासाठी फिल्डिंग

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होणार आहे. भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळाली तर कोण कोणाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार हे ठरवून ठेवण्यात आलं आहे. फरक तो एवढाच आहे की, काही जण खुलेआम छातीठोकपणे हे सांगत आहेत. काही जण गनिमी काव्याने ‘गेम’ करणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा सोपी नसेल.

पक्षांतर्गत बंडखोरी थोपविण्यासाठी यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस आणि संघाचे काही वरिष्ठ व्यक्ती मध्यस्थी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अत्यंत भावनिक पद्धतीने बंडखोरीचा हा मुद्दा हाताळण्यात येणार आहे. त्यामुळे काही इच्छूक गडकरींचं ऐकतील. काही फडणवीसांचं ऐकतील असं सांगण्यात येत आहे. मात्र उमेदवारी जाहीर करताना भाजपलाही पक्षाचा खरा निष्ठावान कोण हे तपासून घेण्याची गरज आहे. अन्यथा निष्ठावंतांना शांत करायचे आणि ‘स्लीपर सेल’च्या हाती ‘कमांड’ द्यायची अशी चूक होऊ नये अशी मागणी स्थानिकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीदरम्यान केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!