महाराष्ट्र

Ajit Pawar : ठरलं, अजित पवार बारामतीमधूनच लढणार !

Amol Mitkari : अजित पवार बारामतीमधूनच लढावे हीच इच्छा

Maharashtra Assembly Elections : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचा चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते. तर या अफवा विरोधकांकडूनच पसरविण्यात येत असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. अशात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

शिक्कामोर्तब

प्रफुल्ल पटेल यांच्या घोषणेनंतर अजित पवार बारामतीतूनच लढणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा निवडणुकीत साऱ्या देशाचे लक्ष बारामतीकडे लागले होते. आता विधानसभा निवडणुकीतही बारामतीकडे देशाचं लक्ष लागलेले आहे. हा मतदारसंघ बहुप्रतिष्ठित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा अजित पवार यांचा तब्बल 1 लाख 53 हजार मतांनी पराभव केला होता.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीतून लढणार की शिरूरमधून, अशा चर्चा रंगल्या होत्या. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे सुपूत्र जय पवार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात होतं. तर काही वेळा अजित पवारच बारामतीतून उभे राहणार असल्याचंही बोललं जात होतं. पण अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असं सूचक वक्तव्य केलं होतं.

अजित पवारांच्या त्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनी मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी, ही बारामतीकरांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. अजित पवार गटाचे काही नेते तुतारी हाती घेणार असल्याची खोटी चर्चा विरोधक पसरवत असल्याचंही मिटकरी म्हणाले.

अखेर ठरलं..

अजित पवार विविध लढण्यासंदर्भात मतदारसंघांतून आढावा घेत असल्याची चर्चा तथ्यहीन असल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार आपला पारंपारिक मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेतूनच लढणार, यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार बारामतीतून लढणार की शिरूरमधून अशा चर्चादेखील सुरू होत्या. लोकसभेप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये पुन्हा पवार विरूध्द पवार, अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : दादा आले वादा करून गेले

मोरल डॅमज करण्यासाठी विरोधकांकडून..

लाडकी बहीण योजनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उंचावलेली प्रतिमा पाहता जाणीवपूर्वक मॉरल डॅमेज करण्यासाठी विरोधकांकडून पिकवलेल्या चर्चा असल्याचे मिटकरी म्हणाले. अजित पवार बारामती सोडणार नाहीत, असा दावाही आमदार मिटकरी यांनी केला. यावेळी त्यांनी लोकसभेत झालेला पराभव जरी वेदनादायक असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीकर भरभरून अजित पवारांना साथ देतील, असा दावाही आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. केवळ विरोधकांकडून चर्चा पेरण्याचे काम केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांची थोबाड विधानसभा निवडणुकीत बंद करू, असा इशाराही मिटकरी यांनी दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!