महाराष्ट्र

Congress : अमरावतीत काँग्रेसला बसणार मोठा धक्का ?

Ajit Pawar Group : काँग्रेसच्या महिला आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर?

Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच पक्षांत आयराम-गयाराम यांची संख्या वाढणार आहे. अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरूवारी (ता. 26) सप्टेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर आले होते. काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी लावलेल्या एका बॅनरमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. सुलभा खोडके या लवकरच अजित पवार गटात प्रवेश करतील, असं बोललं जात आहे.

हीच रणनीती 

जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षांनी रणनिती आखली आहे. जागावाटप आणि स्थानिक राजकीय समिकरणं जुळवली जात आहे. दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांत पक्षांतर सुरु आहे. अशातच काँग्रेसच्या नेत्या आणि एक महिला आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके या लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अमरावतीत गुरुवारी (ता. 26) तपोवनमधील जलशुद्धीकरण केंद्र वाढीव पाणी पुरवठा योजनांचे 865 कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. 865.26 कोटींच्या अमृत- 2, सारथी केंद्र, डफरीन नूतन इमारत, क्रीडा मैदान, विविध विकास कामांची कोनशिला ठेवण्यात येणार आहे. अजित पवारांच्या या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके उपस्थित होत्या. पण खोडके वगळता इतर लोकप्रतिनिधींची गैरहजेरी होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी बॅनर लावलं. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अजित पवार यांच्या स्वागताचे मोठे फलक लावून सुलभा खोडके यांनी अजित पवार गटात प्रवेशाचे संकेत दिल्‍याची चर्चा रंगली आहे. मात्र, पक्षप्रवेशाविषयी भाष्‍य करणे सुलभा खोडके यांनी टाळले.

MNS Leader : मनसे नेत्याची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका !

कोण आहेत सुलभा खोडके?

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. सुलभा खोडके या काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आल्‍या होत्या. मात्र त्यापूर्वी त्यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. बडनेरा मतदारसंघातून त्‍यांनी प्रतिनिधित्‍वदेखील केले होते.

2019च्‍या निवडणुकीत त्‍यांनी पक्ष तसेच मतदारसंघही बदलला आणि निवडूनही आल्या. जिल्‍ह्याच्‍या राजकारणात त्‍यांचे स्‍वतंत्र अस्तित्‍व आहे. दुसरीकडे, सुलभा खोडके यांना जिल्‍ह्याच्‍या काँग्रेसच्‍या राजकारणात डावलले जात असल्‍याची तक्रार सुलभा खोडके यांनी अनेकवेळा केली असल्याचं बोललं जातं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!