महाराष्ट्र

Jitendra Awhad : महाराष्ट्रात पराभवाला दादा जबाबदार, तर परराज्यात कोण?

NCP Politics : अजितदादांचा कार्यकर्ताही त्यांच्यासोबत नाही

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुक पार पडली आहे. भाजप प्रणित महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. भाजपालाही राज्यात मोठा धक्का बसला आहे. यावरुन आरएसएसच्या मुख्यपत्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडले आहे. यावरुन ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांबाबत भाष्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात जितक्या हव्या होत्या तितक्या जागा मिळाल्या नाहीत. राज्यात महायुतीच्या पराभवाला अजित पवार हेच कारणीभूत आहेत. असे खापर आरएसएसच्या एका मुख्यपत्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर फोडण्यात आले आहे. अजित पवार यांच्यासोबत केलेल्या युतीमुळेच भाजपाला मोठा तोटा झाल्याचे या मुख्यपत्रातून म्हटले आहे. या युतीमुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या, असे पत्रात लिहिले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

अशी असावी नेत्याबद्दल निष्ठा

अजित पवार यांच्याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड चिंता व्यक्त करत म्हणाले की, “गेली चार दिवस झाले अजित पवार यांना सगळीकडून घेरलं जात आहे. जणू महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाला अजितदादाच कारणीभूत आहेत. अजितदादांच्या पक्षातील एकही माणूस त्यांच्यासाठी बोलत नाही. आपल्या नेत्याबद्दल प्रेम, आदर असायला पाहिजे. समोरचा कितीही तगडा असला तरी, नेत्यावर झालेला पहिला वार मी स्वतःवर घेणार. अशी मानसिकता ठेवावी लागते, त्यालाच निष्ठा म्हणतात. निष्ठा बाजूला बसवून चहा पिणे नव्हे किंवा खुर्चीला खुर्ची लावून बसणे नाही, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

Nilesh Lanke : पक्षानं बोलायला ठेवलं म्हणून काहीही बोलणार का?

माझ्या नेत्याच्याविरोधात कोणीही बोललं तरीही मी विरोध करणार, याला म्हणतात खरी निष्ठा. सद्यस्थितीत अशी भूमिका कोणीच घेतलेली दिसत नाही. याची मला खंत वाटत आहे. मी एक साधा प्रश्न विचारतो, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवाला कारणीभूत कोण? बंगालमध्ये जागा कमी झाल्या त्याला जबाबदार कोण?, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद असतील. पण, कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा पाठिंबा काढून घेऊ नये. आपल्या नेत्यासोबत खंबीरपणे आहे, हे दाखवायची हीच वेळ असते. फक्त दादांकडे निधी, फायदे, फोन यासाठी दादा नाहीत. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

error: Content is protected !!