AIMIM News : बुलडाणा लोकसभेच्या मैदानात आता ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहाद- उल- मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने उडी घेतली आहे. यासंदर्भात पक्षाची आढावा बैठक झाली. बैठकीनंतर लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव स्पष्ट केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान यांनी दिली.
महाविकास आघाडी व महायुतीने निवडणुकीत कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला संधी न दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा लोकसभेच्या मैदानात आता ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहाद- उल – मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष आता लढणार आहे. यासंदर्भात पक्षाची आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. लवकरच आम्ही उमेदवाराचे नाव निश्चित करू असे जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान म्हणाले.
बुधवारी (ता. 27) बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उमेदवार कोण? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये तिघांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यापैकी एक दलीत समाजाचे उच्च शिक्षित व्यक्ती आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष घाटावरील डॉ. मोबीन खान, घाटाखालील दानिश शेख यांच्या सुद्धा नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान यांनी सांगितले की, मुस्लिम आणि दलित समाजाची साथ एमआयएमला नक्की मिळेल या शंका नाही.