महाराष्ट्र

AIMIM Aggressive : बुलढाण्यात एआयएमआयएम आक्रमक 

Buldhana News : शिकाऊ डॉक्टर तरुणीची छेड काढल्याचे प्रकरण 

District Hospital : बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑन कॉल ड्युटीवर कार्यरत भुलतज्ञ डॉक्टरने प्रशिक्षणासाठी आलेल्या डॉक्टर तरुणीची छेड काढल्याची धक्कादायक घटना 11 मे रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी डॉक्टर तरुणीने स्त्री रुग्णालय प्रशासनाकडे लिखित तक्रार केली. तरी देखील रुग्णालय प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आता एआयएमआयएम आक्रमक झाली. 5 जून पर्यंत सदर डॉक्टर विरोधात कारवाई करून गुन्हा दाखल न झाल्यास बुलढाण्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

स्त्री रुग्णालयात कार्यरत भुलतज्ञ डॉ.अविनाश सोळंके यांच्यावर रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना 11 मे रोजी रात्री जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली होती. याप्रकरणी डॉक्टर तरुणीने स्त्री रुग्णालय प्रशासनाकडे लिखित तक्रार केली. परंतु रुग्णालय प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. सदर पीडित डॉक्टर युवती ही एमजीएम कॉलेज संभाजी नगर येथून 3 महिन्यासाठी सराव करण्यासाठी आलेली होती. दरम्यान रात्रपाळी मध्ये कर्तव्यावर असताना डॉ. अविनाश साळुंकेने दारु पिऊन हात पकडण्याचा प्रयत्न केला व तिचा विनयभंग केला. अशी तक्रार आहे.

Akola News : महापालिका निवडणुकीचा शंखनाद केव्हा

प्रकरणात राजकीय शिरकाव

या प्रकरणात आता राजकारणाचा शिरकाव झालेला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएम पार्टी आता या प्रकरणात आक्रमक झाली. शुक्रवारी पक्षाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. येत्या पंधरा दिवसात डॉक्टरवर पोलिस कारवाई आणि निलंबनाची कारवाई न झाल्यास 5 जून पासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पीडित तरुणी अल्पसंख्याक समाजाची असल्यामुळे अद्यापही कायमस्वरुपी डॉक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक हे पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. 5 जूनपासून जिल्हा रुग्णालयासमोर लोकशाही मार्गाने आरोग्य विभागाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल. पुढे काही अनर्थ घडल्यास व कायदा वसुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आरोग्य प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला. एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान, शेख दानिश आदींची स्वाक्षरी आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!