Election Voting : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला झालं तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये पोस्टल बॅलटने मतदान केल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये वयोवृद्ध महिलेने जगाचा निरोप घेतल्याची बाबा समोर आली आहे.
बुलढाण्यातील पातुर्डा गावात हा प्रकार घडला आहे. सदर वयोवृद्ध महिलेने सोमवारी दुपारी 12 वाजता मतदान केलं आणि 3 वाजता तिचा मृत्यू झाला. अनुसया नारायण वानखडे असं या महिलेचं नाव आहे. मृत्यू हा अटळ आहे तो कोणालाही चुकला नसून मृत्यू कधीही येऊ शकते. मात्र त्यापूर्वी काही तरी चांगले काम करून जावे अशी म्हण या ठिकाणी तंतोतंत बसते.
सध्या देशात लोकसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी निवडणूक आयोग पूर्ण दिवस रात्र एक करत आहे. एकही व्यक्ती मतदाना पासून वंचित राहू नये. यांची काळजी घेणे सुरू आहे. यासाठी ग्रा. पं. कर्मचा-यापासून तर निवडणूक आयोग दिल्ली पर्यंतचे अधिकारी मेहनत घेताना दिसत आहेत. घरपोच मतदान सुविधेचे परिणाम ही चांगले येत आहेत. उदाहरण म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील वयोवृद्ध महिलेचे. सदर महिलेने दुपारी 12 वाजता मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच दिवशी 3 वाजता जगाचा निरोप घेतला. ही घटना लोकसभेच्या दृष्टीने चर्चेची ठरत आहे. मृत्यू हा अटळ आहे तो कोणालाही चुकला नसून मृत्यू कधीही येऊ शकते.मात्र त्यापूर्वी महिलेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. निवडणूक आयोगाने घरपोच मतदानाचा फायदा पातुर्डा येथे झाला आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी पासून जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे व मतदान पासून कोणीही वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
पातुर्डा येथील बुथ क्र. 224 च्या अनुसया नारायण वानखडे वय 86 वर्ष यांचा अधिसूचना जाहीर झाल्यापासून 5 दिवसाच्या आता फाॅर्म 12 डी भरून घेतला व तो निवडणूक असयोगाने पात्र ठरवत त्यांना गृह मतदान बाजावण्याचा हक्क दिला. मतदान दि. 21 पासून सुरू झाले होते या बुथचे बीएलओ संजय सातव यांनी दि 22 ला दुपारी 12 च्या दरम्यान निवडणूक विभागचे कर्मचारी याना सोबत घेऊन अनुसया नारायण वानखडे यांचे पोस्टल मतदान करून घेतले. आणि दुपारी 3 वाजता त्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मात्र जाता जाता त्यांनी आपला मतदानचा हक्क बजावला.
Lok Sabha Election : काँग्रेस मधील दोन नेत्यांमध्ये सभेनंतर फ्री स्टाईल !
85 वर्षावरील मतदार आणि 40 टक्के पेक्षा जास्त अपंग (मतदान खोली पर्यंत जाऊ न शकणारे) यांना आरामात मतदान करण्याचा पर्याय असेल त्याला पीडब्ल्यूडी असे नाव दिले आहे. कोविड 19 संकट दरम्यान 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुक दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम प्रायोगिक पोस्टल मतप्रत्रिकेद्वारे मतदान करण्यात येईल असे निवडणूक आयोगाने सांगितले व 2024 च्या लोकसभा मध्ये सुरुवात करण्यात आली.