महाराष्ट्र

IAS Puja Khedkar : महाराष्ट्र लोकसेवा आयोगही ॲक्शन मोडवर!

Public Service Commision : पूजा खेडकर प्रकरणानंतर घेतला धसका; दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर आता राज्य लोकसेवा आयोगही ॲक्शन मोडवर आलं आहे. या प्रकरणाचा धसका घेऊन राज्यभरातील दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या जाहीर झालेल्या तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससीने हे कठोर पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अश्यात आता एमपीएसच्या पातळीवर मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्यांचीही आता चौकशी होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अश्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा-2022 च्या निवड प्रक्रियेत 22 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 8 उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यादीतील 8 जणांविरुद्ध तक्रारी आल्या आहेत.

अनुपस्थित राहणारे संशयास्पद

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्जदार आणि प्रतिसादकर्त्यांनी प्राधिकरणासमोर उपस्थित राहावे. आणि दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. पडताळणीचे निर्णय 5 ऑगस्ट, 2024 पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाला कळवायचे आहेत. प्राधिकरणासमोर गैरहजर रहाणाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद मानले जाउन निवड प्रक्रियेतून वगळले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

8 विद्यार्थ्यांची तक्रार

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क (वाहनचालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एमपीएससीवर पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आठ विद्यार्थ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर आता आठही उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात मॅटने चौकशी सुरु केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!