महाराष्ट्र

Gondia  News  : अदृष्य शक्तीवर अखेर ‘चाबी’ फिरली..

Hurdle Clear  :उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू

Gondia Flyover : आमदार विनोद अग्रवाल यांच्या इशाऱ्याची दखल घेतली आणि रखडलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम काम झाले सुरू. शहरवासीयांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी आठ दिवसांपूर्वी अदृष्य शक्तीमुळे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्याचा आरोप केला होता. 

आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर अखेर आज कामाला सुरुवात देखील झाली. त्यामुळे अखेर अदृष्य शक्तीवर आमदारांची चाबी भारी पडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. तर पुन्हा काम बंद पडल्यास ती शक्ती भारी पडेल, असे देखील म्हटले जात आहे.

अदृश्य शक्तीची बाधा

आमदार विनोद अग्रवाल यांनी माध्यमांसमोर अदृष्य शक्त्ती विकासकामांत बाधा आणत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी त्या अदृष्य शक्तिचे नाव सांगितले नव्हते. त्यानंतर या प्रश्नावरून आमदार विनोद अग्रवाल आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यात सोशल मीडियावरून एकमेकांवर आगपाखड करण्यात आली. त्यामुळे अदृष्यशक्ती माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना संबोधले असावे, असेही बोलले जात आहे.

2019 नंतर गोंदिया विधानसभा क्षेत्राचे समीकरण बदलले. ऐनवेळी भाजपने विनोद अग्रवाल यांना तिकीट नाकारले. तर निवडणुकीच्या अगदी तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले गोपालदास अग्रवाल यांना भाजपचे तिकीट देण्यात आले. विनोद अग्रवाल यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. भावनिक कार्ड खेळत त्यांनी निवडणूक लढविली. मतदारांनी देखील प्रतिसाद देत त्यांना निवडून दिले.

त्यानंतर आतापर्यंत आजी-माजी आमदार एकमेकांवर कुरघोडी करण्यात कोणतीच कसर सोडत नाही. अग्रवाल यांनी निवडणूक जिंकताच भाजपला पाठिंबा दिला होता.तर आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत फडणवीस यांनी चाबी भाजपमध्ये विसर्जित झाल्याचे भाष्य केले होते. तेव्हापासून दोन्ही गटांत अधिकच तणाव निर्माण झाला आहे.

गोंदियातील जुना उड्डाणपूल तोडण्यात आला. त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. निधी आणण्यात आपले श्रेय असल्याचे दोन्ही आजी माजी आमदारांनी सांगितले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली. निविदा प्रक्रियेला उशीर झाल्याने शहरवासीयांनी चांगलीच आगपाखड केली.

Gondia News : आमदार अग्रवाल यांच्या वक्तव्याने पेटले गोंदियाचे राजकारण

त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी भूमिपूजन करीत पुन्हा श्रेयवादाचा लढा सुरू झाला. मात्र भूमिपूजनानंतर काम सुरू झालेच नाही. शहरातील एका नामांकित सामाजिक समुहाने हा विषय रेटून धरल्याने अखेर आमदार अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आठ दिवसांत काम सुरू करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. बांधकाम एका अदृष्य शक्तिमुळे रखडल्याचे त्यांनी सांगितले होते. विद्यमान आमदारांपेक्षा मोठी शक्ती कोणती ? हे मात्र त्यांनी उघड केले नव्हते. अखेर प्रशासनाने तातडीने बांधकाम सुरू केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!