महाराष्ट्र

Assembly Election : मुस्लिमांना उमेदवारी द्या; नाहीतर जागा दाखवू

Afroz Mulla : मुस्लिम फ्रंटचा सर्व राजकीय पक्षांना इशारा

Muslim community : राज्याच्या विधानसभेत मुस्लिम समाजाचे किमान 40 आमदार असायला हवे. त्याकरिता आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या किमान 15 टक्के उमेदवारांना उमेदवारी द्या, अशी मागणी मुस्लिम फ्रंटकडून करण्यात आली आहे. राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ही मागणी करण्यात आल्याची माहिती मुस्लिम फ्रंटचे राज्य समनव्यक ऍड. अफरोज मुल्ला यांनी 4 सप्टेंबर ला अकोल्यात दिली.

आमची ताकद दाखवून

‘तुम्हाला केवळ मुस्लिम मते पाहिजेत. त्यांना उमेदवारी का नाही? आमचं राजकारण जर केवळ खजूर आणि इफ्तार पुरता सीमित राहणार आहे का? असे असेल तर आम्ही समाज म्हणून आमची काय ताकद आहे दे दाखवून देऊ. आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे जागा मिळत नसतील तर निवडणुकीत त्या पक्षांना त्यांची जागा दाखवून देऊ,’ असा इशाराही अफरोज मुल्ला यांनी यावेळी दिला.

तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपावरून चर्चांच्या फेऱ्या पार पडत आहेत. वेगवेगळ्या जागांवर दावे प्रतिदावे महायुतीत आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षाकडून करण्यात येत आहेत. अशातच आता सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटनेही काही जागांची मागणी राज्यातील प्रमुख पक्षाकडे केली आहे.

सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांना मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने औपचारिक पत्र पाठवले होते. त्याबाबत सकारत्मक चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये, मुस्लिम समाजाच्या 15% जनसंख्येच्या टक्केवारीनुसार विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आलेली होती. राज्यभर यात्रा काढून मागणी केली जात आहे. या यात्रेला मिळत असलेला पाठिंबा सर्वत्र राजकीय पक्षांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

Congress : महायुती सरकारचे फक्त वसुलीवर लक्ष

लोकसभे समर्थन

अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिले होते. त्यामुळे आघाडीला त्याचा फायदा झाला. तरीही, सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्य आहे. विधान परिषदेत एकही सदस्य नाही. लोकसभा मतदारसंघात देखील प्रतिनिधित्व नाही. मुस्लिम समाज महाराष्ट्रातील 65 विधानसभा मतदारसंघांत निर्णायक ठरतो. तरीही त्यांच्या प्रतिनिधित्वाची अवस्था चिंताजनक असल्याचा आरोप मुस्लिम फ्रंटचा आहे.

राजकीय पक्षांना इशारा

मुस्लिम फ्रंट कडून राज्यातील सर्व राजकीय पक्षांना इशारा देण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार 15% उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. 15 टक्के मुस्लिम उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी न दिल्यास त्या पक्षांना राज्यात त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा ऍड. अफरोज मुल्ला यांनी दिला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!