महाराष्ट्र

Sanjay Kute : नाराज कार्यकर्ते देवाभाऊंच्या भेटीला

BJP : संजय कुटे यांनाही होती मंत्रिपदाची अपेक्षा

Cabinet Expansion : कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीची लाट आली आहे. शिवसेनेनंतर भारतीय जनता पार्टीमध्येही नाराज आमदारांची संख्या वाढली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे हे देखील नाराज झाले आहेत. संजय कुटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी, त्यांचे समर्थक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे संजय कुटे यांच्यापेक्षा आकाश फुंडकर हे वरचढ ठरले आहेत. आकाश फुंडकर हे दिवंगत माजी खासदार पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. पांडुरंग फुंडकर हे आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिले. त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र आकाश फुंडकर हे देखील भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिले आहेत.

परिश्रमाचे फळ

भारतीय जनता पार्टीमध्ये आकाश फुंडकर यांनी एकनिष्ठपणे काम केले आहे. आमदार झाल्यापासून त्यांनी कधीही पक्षाकडे काहीही मागितले नव्हते. आमदार म्हणून आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपले काम सुरू ठेवले. आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही त्यांनी कधीही अनावश्यक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे संयम आणि एकनिष्ठ चे आता त्यांना मिळाले आहे. राज्यमंत्री नव्हे तर त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी दाट शक्यता होती. संजय कुटे यांचे कार्यकर्ते देखील जल्लोषाच्या तयारीत होते. अखेरच्या क्षणापर्यंत संजय कुटे हे देखील शपथविधीसाठी फोन येईल, याच्या प्रतीक्षेमध्ये होते. परंतु त्यांच्या समावेश मंत्रिमंडळामध्ये झाला नाही. त्यानंतरही स्वतः संजय कुटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांचे समर्थक मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.

Ravi Rana : शपथविधी आधीच लावलेले मंत्री पदाचे बॅनर अंगलट

महायुती सरकारमधील सध्याच्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहे. महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदाच हा फार्मूला वापरण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये संजय कुटे यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संजय कुटे हे कोणती भूमिका घेतात, याकडे भाजपसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यानंतरही संजय कुटे यांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्यामागे फडणवीस यांचा नक्कीच काहीतरी गहन विचार दिसत आहे. त्यामुळे संजय कुटे हे स्वाभाविकपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाहीत, असे दिसत आहे. समर्थकांची नाराज होणे स्वाभाविक असले तरी कुटे हे त्यांना देखील समजावतील अशी शक्यता अधिक आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!