महाराष्ट्र

Mahayuti 2.0 : मंत्री पदासाठी अद्याप यादी फिक्स नाही 

Maharashtra Government : अजित पवार म्हणाले, लवकरच चित्र स्पष्ट होईल 

New Cabinet : सत्तेवर येत असलेल्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव फिक्स झाले आहे. मात्र अद्याप इतर मंत्र्यांची नावे आणि त्यांची खाती ठरलेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. या संदर्भातील माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे शपथविधी संदर्भातील तारखांचा समारंभ आता दूर झाला आहे. 

महाराष्ट्र मध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर येत असताना अनेकांनी मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे. मात्र अद्याप मंत्र्यांच्या नावाची यादी फिक्स झाली नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे 5 डिसेंबरला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार का? अशी चर्चा होत आहे.

अनेक नावं चर्चेत

मंत्री पदासाठी सध्या अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, गिरीश महाजन, भावना गवळी, संजय राठोड, मदन येरावार, धर्मराव बाबा आत्राम, रणधीर सावरकर, रवी राणा यांची नावं आघाडीवर आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये असलेल्या अनेक मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार आहे. मात्र नवीन चेहरे कोण असणार, याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे.

आपल्याला मंत्रिपद मिळावा यासाठी अनेक आमदारांनी ‘लॉबिंग’ सुरू केलं होतं. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विदर्भातून 24 आमदार मंत्रीपदाच्या स्पर्धेत आहेत. भाजपकडून सर्वाधिक १८, शिवसेनेतून दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौघांकडून दावेदारी केली जात आहे. यातील नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

लाखाच्या वर मते घेऊन विजयी झालेले शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनाही मंत्रिपद देण्याची मागणी स्थानिक भाजप कार्यकर्ते करीत आहेत. काँग्रेसमुक्त गोंदियामागे खासदार प्रफुल्ल पटेल यांची रणनीती होती. परिणामी निवडून आलेल्या आमदारांपैकी कुणाला मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय खासदार पटेल यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

Maharashtra CM : ‘महायुती 2.0’चा शपथविधी 5 डिसेंबरला?

बडोले यांनाही संधी?

राजकुमार बडोले 2014 मध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री होते. पटेल यांनी आपल्या प्रचारसभेत बडोले यांना आमदार बनविण्यासाठी नव्हे तर मंत्री बनविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केले होते. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे रणधीर सावरकर हॅट्‌ट्रिक करत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. रविवारी रात्रीच त्यांना मुंबईलाही बोलावून घेण्यात आले आहे. चैनसुख संचेती यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघात सलग पाचवेळा आपला गड कायम राखला. वर्धा जिल्ह्यात भाजपचे चारही आमदार निवडून आले. हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांनी हॅट्‌ट्रिक केली. त्यांचेही नाव आता चर्चेत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!