महाराष्ट्र

Lok Sabha Election : नाना पटोले यांच्या गाडीला अपघात, नाना थोडक्यात बचावले

Nana Patole : प्रचार करून परत येत असताना ट्रकने दिली मागून धडक, राजकीय घातपाताची शक्यता?

Bhandara Gondiya constituency : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांची निवडणूक अधिकच गंभीर घेतली असून विजय प्राप्त करण्यासाठी नाना दिवसरात्र एक करीत आहेत. कालचा प्रचार दौरा आटोपून रात्रीच्या सुमारास नाना पटोले स्वगावी जायला निघाले होते. दरम्यान भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीचा मागचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला. मात्र नानांना व गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली असून भंडारा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे.

Nana Patole : मला अडीच महिन्यांपासून ‘टॉर्चर करत आहे

राजकीय घातपात?

या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले असून नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपाताची शक्यता असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. नाना आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अख्खा जिल्हा पिंजून काढत आहेत; यामुळे विरोधकांना याची धडकी भरली असून त्यातून घडलेला हा प्रकार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!