महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : अमित शाह असताना नितीन गडकरी गायब

Congress : वडेट्टीवार म्हणाले, भाजपचे पाय खोलात गेल्याची स्पष्ट संकेत

Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीला पूर्णपणे नाकारण्याचा निर्णय मतदारांनी केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपने लोकांचा विश्वास गमावला आहे. विशेषतः विदर्भामध्ये भाजपचे पानिपत झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच विदर्भात येऊन गेले. त्यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या बैठकीला नव्हते. नितीन गडकरी हे विदर्भातील भाजपचे दिग्गज नेते आहेत. केंद्रीय नेत्याच्या बैठकीतून गडकरी गायब असणे स्पष्ट संकेत देत आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपचे पाय विदर्भात खोलात आहे हे स्पष्टपणे दिसते. विदर्भासह महाराष्ट्र भाजप आता मुसंडी मारू शकत नाही असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. भाजपमधील ही परिस्थिती पाहता त्यांची दया वाटते. मात्र हा सर्व प्रकार त्यांच्या कर्माची फळे आहेत असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. विदर्भामध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. अगदी तसेच यश विधानसभा निवडणुकीत आहे आघाडीला मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडकरी नाराज?

गेल्या अनेक दिवसांपासून नितीन गडकरी हे नाराज असल्याचे बोलले जात होते. काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षातील समित्यांवरून कमी केले होते. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही गडकरी यांचे मत विचारात घेतले गेले नाही, अशी चर्चा होती. इतिहासात प्रथमच या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी हा इतिहास घडवला. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाने काही निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. परंतु अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे पानिपत झाले.

Anil Deshmukh : एन्काऊंटरचा विषय संशयास्पद

भाजपला विदर्भात जबरदस्त फटका सहन करावा लागला. केवळ नितीन गडकरी हेच स्वबळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. उर्वरित सर्व जागांवर भाजप आणि महायुतीचे उमेदवार पराभूत झालेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा गाजावाजा करत सभा घेतली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्या मोजक्याच सभा महाराष्ट्रात झाल्या होत्या. मोदी आणि शाह यांच्या सभा झाल्यानंतरही मतदारांनी बहुतांश ठिकाणी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना नाकारले.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजप जमिनीवर आली. त्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. नितीन गडकरी यांना सोबत घेतल्याशिवाय यश मिळणे अवघड आहे, हे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना एक महिना महाराष्ट्रात प्रचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. अशातच केंद्रीय मंत्री अमित शाह विदर्भात असताना नितीन गडकरी हे अनुपस्थित होते. त्यावरून आता विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गडकरी यांच्या अनुपस्थिती मागील कारण काही असले तरी सद्य:स्थितीत महायुतीसाठी (Mahayuti) महाराष्ट्र सहजासहजी काबीज करणे अवघड असल्याचे चित्र आहे.

error: Content is protected !!