Nda Focus : प्रत्येक निवडणुकीची काही वैशिष्ट्ये असतात. संकल्प, निर्धार व्यक्त करणा-या घोषणा, नारे दिले जातात. या लोकसभा निवडणुकीत एनडीएने ‘अबकी बार 400 पार’ असा संकल्प केला आहे. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने केलेल्या प्रचंड विकासकामांचा आधार दिला जात आहे. तसेच पुढच्या काळात भारताला महाशक्ती करण्यासाठी मतदारांनी एनडीएला शक्ती द्यावी हे आवाहन त्यात आहे. परंतु विरोधी मतप्रवाह त्यांच्या परीने व्यक्त होत आहे.
निवडणुकीला असते पार्श्वभूमी
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांवर मते मागितली जातात तसेच एखादी घटना, प्रसंग निवडणूक भारावून टाकतो. एखाद्या नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, देशावरील परकीय संकट तसेच देशांतर्गत मुद्दे केंद्रस्थानी राहतात. एखादा वरिष्ठ नेता प्रचारात भिजला तरी चमत्कार घडलेला महाराष्ट्राने अनुभवला आहे. पंतप्रधान मोदी यांना देशाला कोणत्या वळणावर न्यायचे हे अगदी पक्के आहे. प्रचारात त्यावर भर दिला जात आहे.
खरचं 400 पार झाले तर…
एनडीए, इंडिया आघाडी यांना नेमक्या किती जागा मिळतील हे 4 जूनला कळेल. परंतु विरोधक मात्र आपल्या परीने तारे तोडत आहेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास काय अनिष्ठ होऊ शकते हाच चर्चेचा मुद्दा आहे.
संविधान, आरक्षण…
एनडीएला संविधानात बदल करायचा असल्याने 400 पार जागा हव्या आहेत. तसेच आरक्षणातही बदल होऊ शकतो. अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे रक्षण होईल की नाही अशी विनाकारण शंका उपस्थित केली जाते. आणि काही राजकीय पक्ष त्याला हवा देण्याचे काम करतात. परंतु काहीही झाले तरी 4 जून नंतर प्रत्येक गोष्टींची उत्तरे इव्हीएम मधून मिळणार आहेत. परंतु तोवर चर्चा थोडीच थांबते.