महाराष्ट्र

Abhijeet Wanjari : विदर्भात काँग्रेस लढू शकते 62 जागा 

Congress : प्रत्येक पक्षाला आपले नेटवर्क मजबूत करण्याचा हक्क 

Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला पसंती दर्शवली आहे. विदर्भात काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे या भागातील 62 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवू शकते. नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी ही शक्यता व्यक्त केली. काँग्रेसची राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात तयारी झालेली आहे. प्रत्येक पक्षाला मतदारसंघांमध्ये आपली ताकद किती आहे हे चाचपण्याचा अधिकार आहे. काँग्रेसही याच पद्धतीने 288 मतदारसंघात चाचपणी करीत असल्याचे वंजारी म्हणाले.

महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची एकजूट कायम आहे. कोणत्याही पक्षांमध्ये मतभेद नाहीत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक ही आघाडी लढेल. 288 जगांचे वाटप करताना मैत्रीपूर्ण लढत होईल, असे संकेतही वंजारी यांनी दिले. विदर्भातील जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. महाविकास आघाडीतही काँग्रेसची भूमिका मोठी आहे. त्यामुळे जनतेचे काँग्रेस वरील प्रेम दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

निकालानंतर उत्साह

लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकसभेतील मतांची टक्केवारी पाहिल्यास महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय निश्चित होईल, असं ठाम विश्वास आमदार अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केला. शिवसेना 288 जागांसाठी तयारी करत आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत विधान केले आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे देखील आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही अशी तयारी नसण्याची काही कारण नाही. महाराष्ट्रातील 154 विधानसभा मतदारसंघात भाजपची अवस्था वाईट आहे. यावरून लोकांना काय हवे आहे हे सर्वांनी समजून घ्यावे, असे वंजारी म्हणाले.

सूड उगवणे भोवणार 

भाजपने महाराष्ट्रात सुडाचे राजकारण केले. हा प्रकार भाजपला चांगलाच भोवणार आहे. विशेष म्हणजे विदर्भातील जनतेने भाजपला यांना नाकारले आहे. भविष्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची काम पडल्यास काँग्रेस तयार आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस दीडशेवर जागांवर जिंकेल, असा दावाही अभिजीत वंजारी यांनी केला. काँग्रेसने नेहमी सामान्यांचा विचार केला. त्यामुळे सामान्य नागरिक ही आता काँग्रेसला साथ देत आहेत याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

NCP Politics : मिटकरींचा दावा, बाप्पांनी केला दादांचा धावा 

सक्षम मुख्यमंत्री 

विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यास नाना पटोले हे मुख्यमंत्री होऊ शकतात. पटोले मुख्यमंत्री झाल्यास विदर्भाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळण्याचा आनंदच असेल. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सध्या निकालांची विश्लेषण सुरू आहे. विश्लेषणाच्या अहवालानुसार विधानसभा निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. महाराष्ट्राला बहुतांश मुख्यमंत्री काँग्रेसने दिले आहेत. आजही सक्षम मुख्यमंत्री देण्यास काँग्रेस समर्थ आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!