महाराष्ट्र

Lok Sabha Election : वंचितच्या उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, यवतमाळ मध्ये राहणार ‘वंचित’च!

Nagpur High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

Yavatmal washim constituency : अर्जात त्रुटी असल्याने यवतमाळ-वाशीम मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द झाल्यानंतर याविरोधात राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र,नागपूर खंडपीठाकडून वंचितच्या उमेदवाराची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का मानला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीने 4 एप्रिल रोजी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला. सुभाष खेमसिंग पवार यांच्या ऐवजी अभिजित राठोड यांना संधी देण्यात आली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, छाननीच्या दिवशी अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय अवैध असल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला होता. त्यामुळे अभिजित राठोड यांनी नागपूर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत निर्णय घेण्यापूर्वी सुनावणीची योग्य संधी दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील ॲड.चव्हाण यांनी केला. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला दिला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. यवतमाळ – वाशिम मतदारसंघात ‘वंचित’ आता उमेदवारीपासून वंचित राहणार आहे.

Bhavana Gawali : भावानेच झुगारले बंधन…’भावनां’चा फुटला बांध;

वंचितने वेळेवर बदलले उमेदवार!

वंचित बहुजन आघाडीकडून यादी जाहीर करण्यात आल्यानंतर तीन उमेदवार बदलण्यात आले. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. अमरावती मध्येही आधीच्या उमेदवारा ऐवजी आंनदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!