Liquor Sacam : कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केजरीवाल यांची तब्बल 177 दिवसांनी तरुंगातून सुटका झाली आहे. या घोटाळ्यासाठी 13 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना जामीन मिळाला. केजरीवाल यांना जामीन मिळताच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करीत आहेत. हा सत्याचा विजय असल्याचे म्हणत अकोल्यात ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला.
देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. तेव्हा अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडिंगग प्रकरणात नऊ वेळा ईडीकडून नोटीस (ED) पाठविण्यात आली होती. त्यांनी नोटीसकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना 21 मार्च 2024 रोजी अटक करण्यात आली. कोर्टाने त्यांना तुरुंगात पाठविले. केजरीवाल यांची सतत चौकशी करण्यात आली. ज्यात अनेक तथ्य समोर आलेत.
निवडणूक अन्...
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यावेळी केजरीवाल यांना 10 दिवसांच्या चौकशीनंतर 1 एप्रिल रोजी तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. निवडणुकीत प्रचारासाठी त्यांना 21 दिवसांचा तात्पुरता जामीन मिळाला. 51 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची सुटका झाली. 2 जून रोजी केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यानंतर आता 13 सप्टेंबरला केजरीवाल यांची सुटका झाली आहे. त्यामुळे 177 दिवसांपैकी केजरीवाल एकूण 156 दिवस तुरुंगात राहिले. केजरीवाल यांची सुटका होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
फटाक्यांची आतंशबाजी
केजरीवाल मुक्त होताच ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. अकोल्यातील मदनलाल धिंग्रा चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मिठाईचे वाटप करण्यात आले. ढोल ताश्यांच्या निनादात नृत्य करण्यात आले. फटाक्यांची आतंशबाजी करण्यात आली. आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजाळे, शहराध्यक्ष हाजी मसूद अहमद यांच्या नेतृत्वात हा आनंदोत्सव साजरा झाला. दिल्लीच्या उच्च न्यायालयात (Delhi High Court) दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. सीबीआयच्या (CBI) खटल्यात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेरही जल्लोष करण्यात आला.