देश / विदेश

Atishi Marlena : दिल्लीत पाणी प्रश्नावरून ‘आप’ आक्रमक

AAP : पंतप्रधानांना लिहिण्यात आले पत्र..पोषणाचा इशारा

Delhi : दिल्लीतील पाणी टंचाईचा प्रश्न आता चांगलाच गाजताना दिसत आहे. दिल्लीत तापमान प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत सामान्य दिवसांपेक्षा पाण्याची मागणी जास्त असते. काही राज्यांप्रमाणे दिल्लीलाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. पाण्यासाठी झगडावे लागते. दिल्लीतील पाण्याचे संकट हे भाजप पुरस्कृत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला. त्यात आता दिल्ली सरकारमधील जल मंत्र्यांनीच उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे. जनतेला समस्या आल्या की त्या सोडविण्यासाठी जनता राज्यातील सरकारकडे बोट दाखवते. पण दिल्लीत सरकार स्थानिक प्रश्नासाठी केंद्र सरकारवरच आरोप करत असल्याने पाण्याचे राजकारण रंगात आले असल्याची चर्चा आहे.

Ujjwal Nikam : निवडणूक हरले अन् पुन्हा सरकारी वकील झाले

पाणी टंचाईच्या प्रश्नावरून आता दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी अंतिम इशारा दिला आहे. 21 जूनपर्यंत दिल्लीतील लोकांना पाणी मिळाले नाही तर मी उपोषण करेन, असे आतिशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुरेशे पाणी नाही

दिल्लीत तीव्र उष्णता आहे आणि आपल्याकडे पुरेशा पाण्याची कमतरता आहे, असे आतिशी म्हणाल्या. दिल्लीचा एकूण पाणीपुरवठा 1050 एमजीडी आहे. त्यात 613 एमजीडी हरियाणामधून येतो. काल हरयाणातून 100 एमजीडी कमी पाणी आले. 1 एमजीडी पाणी 28500 लोकांना पाणी पुरवते. म्हणजेच 100 एमजीडीच्या टंचाईमुळे 28 लाख लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या मुद्द्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयातही गेलो होतो. काल दिल्लीतील सर्व बडे अधिकारी हरियाणा सरकारकडे पाणी मागण्यासाठी गेले, पण त्यांनी नकार दिला.

21 जूनपासून बेमुदत उपोषण

हरियाणाने 28 लाख लोकांचा पाणीपुरवठा बंद केला. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी जनता तळमळत आहेत. दिल्लीतील लोकांना पाणी मिळावे यासाठी पंतप्रधानांना पत्रदेखील लिहिल्याचे आतिशी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी 2 दिवसात दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा 21 तारखेपासून बेमुदत उपोषण करणार, असा इशाराही आतिशी यांनी दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!