महाराष्ट्र

Akola AAP : पाचही मतदारसंघात उमेदवार देणार

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी सज्ज

Strategy Decided : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीचे. ही निवडणूक अवघ्या काहीच महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. विधानसभा मतदारसंघावर दावे करण्यात येत आहेत. अशातच आता आम आदमी पार्टीने तयारी सुरू केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आम आदमी पार्टीने उमेदवार देणार आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आम आदमी पार्टी उमेदवार देणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता.2) जिल्हा संयोजक कैलाश प्रांजळे, महानगर अध्यक्ष मसूद अहमद यांनी दिली.

निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपावर प्राथमिक चर्चांना वेग आला आहे. देशातील सर्वच पक्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये दिल्ली आणि पंजाबमध्ये यशस्वी ठरलेली आम आदमी पार्टीही सज्ज झाली आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने राज्यात पहिल्यांदाच उडी घेतली. जवळपास 50 ठिकाणी आपले उमेदवार ‘आप’ने जाहीर केले होते. आता पुन्हा यावर्षीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी जास्त उमेदवार देण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर चाचपणी

‘आप’कडून स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले आहे. विदर्भातील काही महत्वाच्या जिल्ह्यांवर आम आदमी पार्टीने फोकस केला आहे. यातम अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात आम आदमी पार्टी उमेदवार देणार आहे. त्यानुसार अकोल्यात असलेल्या पाच विधानसभेच्या जागांवर पार्टी सक्षम उमेदवार उभे करणार आहे. देशात पंजाब व दिल्लीमध्ये जनतेने आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत दिले. सरकार बहुमतात असल्याने पंजाब आणि दिल्लीतील जनतेला 200 युनिटपर्यत मोफत वीज देण्यात आली. शिक्षणही मोफत करण्यात आले. आरोग्याच्या सुविधा मिळाल्या. अनेक सुविधाही पुरविण्यात आम आदमी पार्टी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पंजाब आणि दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेलाही सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील 288 जागा लढविण्याचा निर्धार आम आदमी पार्टी करणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर करताना पक्षातील सक्षम पदाधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. काही ठिकाणी उमेदवार निवडीचा विचार पक्षश्रेष्ठी करणार आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते उमेदवारांच्या नावांची घोषणा करतील, असे सांगण्यात आले. अकोल्यात पाच विधानसभा मदतारसंघात ‘आप’ निवडणूक लढणार असली तरी उमेदवारांच्या नावांवर यावेळी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!