महाराष्ट्र

AAP : महाराष्ट्रात 12 रुपये दराने वीज विक्री

Power Scam : कोळशाच्या खरेदी भ्रष्टचाराचा ‘आप’चा आरोप

Electricity Department : महाराष्ट्रात देशातील सर्वांत महाग वीज वितरित करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रात सर्वांत महागडी वीज विकण्यात येत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. महावितरण ही वीज महाजनकोकडून मोठ्या प्रमाणात विकत घेते. विजेच्या उत्पादनात कच्चामाल म्हणून कोळसा सगळ्यात जास्त प्रमाणात लागतो. महाजनकोला (Mahagenco) हा कोळसा महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनद्वारे (MSMC) पुरविला जातो. 2019 मध्ये महाजनकोने एमएसएमसीला कोळसा पुरविण्याची निविदा मंजूर केली होती. महाजनकोचे कोळशाद्वारे वीज बनवणारे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणजे कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर आहे, असे ‘आप’ने नमूद केले. यासंदर्भात ‘आप’च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने एकत्रितपणे काही मागण्या केल्य आहेत.

आपचा आरोप 

एमएसएमसीला रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर, हिंद मिनरल, महावीर मिनरल्स लिमिटेड व इतर वॉशरी प्रामुख्याने कोळसा पुरवितात. एमएसएमसी या वॉशरीजमधून कोळसा घेऊन महाजनकोला विकते. 2019 मध्ये मंजूर केलेल्या निविदा अनुसार हा पुरवठा केला जातो. एमएसएमसीद्वारा महाजनकोला पुरविला जाणारा कोळसा हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोपही ‘आप’ने केला आहे. निविदेनुसार 31 टक्के अॅश या दर्जेचा कोळसा महाजनकोला पुरवायचे ठरले होते. पण एमएसएमसी 50 टक्क्याहून अधिक अॅश असणारा निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवित आहे.

उत्पादनावर ताण

निकृष्ट दर्जाचा कोळसा कमी कॅलोरेफिक दराचा आहे. त्यामुळे उत्पादन केंद्राचे वीज निर्मितीचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर निर्मिती केंद्राच्या दुरूस्ती व देखभालीचा खर्च देखील वाढला आहे. यामुळे वीज उत्पादनाची दर वाढ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या जनतेला देशातले सगळ्यात महाग विजेचे दर मोजावे लागत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कोळशामध्ये ईएसपी डस्ट व डोलाचार असे कोळशा सारखे दिसणारे घटक मिसळले जातात. कोळशाव्यतिरिक्त तशाच प्रकारे दिसणाऱ्या पदार्थांची कोळशामध्ये केली जात आहे.

भेसळयुक्त कोळशामुळे महाजेनकोला पुरवठा होत असलेल्या मालातून कॅलरीफिक दर कमी होते. अॅश प्रमाण वाढते. निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे उत्पादन केंद्र मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत. वीज निर्मिती केंद्राच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात श्वासाचे, किडनीचे व हाडांचे आजार आढळून येत आहेत. निकृष्ट दर्जाचा कोळसा कोणाकोणाच्या संगनमताने वापरला जात आहे, याच्या चौकशीची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याच्या पापामध्ये व कटकारस्थानामध्ये कोण सामील आहे, त्यांची नावे उघड करावी. दोषींवर कारवाई करावी. महाजनकोने एमएसएमसीला प्रदान केलेल्या कामांसंदर्भात निविदेबाबत निष्पक्ष न्यायिक चौकशी करण्याची मागणीही ‘आप’ने केली आहे.

Devendra Fadnavis : भाजपने ग्रहशांतीची पूजा करावी !

कडक कारवाई मागणी 

भेसळयुक्त मालापैकी काही कोळसा महाजनकोद्वारे नावापुरता नाकारला जातो. हा नाकारलेला कोळसा वॉशरीजद्वारे उपभोग करणाऱ्या उद्योगांना महागड्या दरात विकला जातो. नाकारलेल्या कोळशाची स्थुल कॅलरीफिक दर तपासणे गरजेचे आहे. या कोळशाच्या काळा बाजारवरती व जनतेच्या पैशांच्या उघड्या लुटवरती अंकुश लावणे गरजेचे आहे. वॉशरीजवरती कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आम आदमी पार्टीच्या राज्य कार्यकारिणी कडून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!