प्रशासन

Buldhana : बापरे..! तब्बल सहा बिबट जेरबंद..

Leopard : गिरडा शिवारात सहावे बिबट अडकले वन विभागाच्या पिंजऱ्यात

Girda Area : बुलढाणा तालुक्यात अजिंठा पर्वतरांगा आहेत. या अजिंठा पर्वतावर जंगलाच्या टोकावर गिरडा हे गाव वसले आहे. गावाला वेढा घातलेल्या दाट आणि विस्तीर्ण जंगलात बिबट, अस्वल, सारख्या वन्य प्राण्यांचे गावकऱ्यांना नेहमीच दर्शन होते. यामुळे रात्री उशिरा शेताकडे वा दूर जाण्याचे गावकरी कटाक्षाने टाळतात. ऑगस्ट महिन्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुभाष जाधव हा युवा शेतकरी ठार झाला होता. त्यामुळे वनविभाग अलर्ट मोडवर आले होते. गिरडा परिसरातुन दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा वन विभागाच्या पिंजऱ्यात एक मादी बिबट अडकले. गेल्या 2 महिन्यात याच परिसरातून एकूण 6 बिबट वनविभागाने पकडले आहेत. नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे हे बिबाट रवाना करण्यात आले आहेत.

ज्ञानगंगा अभयारण्यातील गिरडा वन वर्तुळात घनदाट जंगल, गर्द झुडुपे, नाले आदी पाण्याचे जलस्रोत आहेत. दऱ्याखोऱ्यातील कपारी, उपलब्ध शिकार, मानवी वस्त्यांमुळे उपलब्ध पाळीव जनावरे, अनुकूल भौगोलिक परिस्थिती आदी विविध कारणांमुळे गिरडा ‘सर्कल’मध्ये बिबट्यांची संख्या आणि वावर वाढला आहे.

बिबट्यांचा वावर  

बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गिरडा वन वर्तुळात बिबट्यांचा वावर वाढला आहे. अलीकडच्या एका घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात युवा शेतकरी मृत्युमुखी पडल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. यामुळे विविध उपाययोजना करण्यात येत असून पाच बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. सोमवारी गुरुवारी एक मादी बिबट पकडण्यात आले. तिची नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये रवानगी करण्यात आली आहे. मानवी वस्त्या विस्तारल्या की संघर्ष वाढतो. यातूनच वन्यजीव आणि मानवी संघर्षांच्या घटना गिरडा परिसरात अधूनमधून घडतात. शेतकऱ्यांच्या पशू धनावरील हल्ल्याच्या तुरळक घटना घडल्या. मात्र, आतापर्यंत मर्यादेत असलेला या संघर्षाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भीषण रूप धारण केले.

मागील २९ ऑगस्ट २०२४ रोजी भरदिवसा दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुभाष जाधव हा युवा शेतकरी ठार झाला होता. तो जंगलाला लागून असलेल्या त्याच्या शेतात कामासाठी आला होता. हल्ला करणाऱ्या बिबट्याने त्याला जंगलापर्यंत फरफटत नेले होते. गिरडा परिसरासह पंचक्रोशीतील हजारो नागरिक व शेतकरी या घटनेमुळे भयभीत झाले होते.

 वन विभाग ॲक्शन मोडवर

या गंभीर घटनेमुळे अधिक सतर्क झालेल्या वन विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. गिरडा गावाजवळ २ पिंजरे लावून वन कर्मचाऱ्यांची ३ पथके स्थापन करण्यात आली. गावकऱ्यांमध्ये जागृती करत वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली होती. वनविभागाने लावलेल्या या पिंजऱ्यात आज गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी एक मादी बिबट अडकले! या बिबट्याला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे रवाना करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ‘एसीएफ’ अश्विनी आपेट यांनी दिली आहे.

Congress Agitation : यावेळी आमदार गायकवाडांना भारी पडणार आगाऊपणा !

अंबाबारवा अभयारण्यात सोडले

बुलढाणा वन विभागाने गिरडा परिसरातून एकूण सहा बिबट्यांना जेरबंद केले आहे. यापैकी ३ बिबट मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्यात सोडण्यात आले. उर्वरित तीन बिबट्यांना नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सोडले. यामुळे गिरडावासी भयमुक्त झाले आहेत. उपवनसंरक्षक सरोज गवस, एसीएफ अश्विनी आपेट, बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. डी. वानखेडे, वनरक्षक प्रदीप मुंडे तसेच वनकर्मचारी यांनी ही कामगिरी बजावली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!