प्रशासन

Yavatmal : पोलिसांचे मॉक ड्रिल; युवक गंभीर जखमी

Mock Drill : डोळ्याजवळ मोठी दुखापत; नागपूरमध्ये उपचार

Police Mock Drill : अचानक उद्भवणाऱ्या संकटात सज्ज राहावे यासाठी पोलीस दल पूर्व तयारी म्हणून मॉक ड्रिल करीत असतात. आपल्या क्षमतांचीच चाचपणी करण्याची ही प्रक्रिया असते. मात्र पोलिसांचे असेच एक मॉक ड्रिल एका तरुणासाठी अडचणीचे ठरले. कारण या मॉक ड्रिलदरम्यान तरुण गंभीर जखमी झाला. यवतमाळ शहरातील शारदा चौकात हे मॉक ड्रिल झाले. दहशतवादी हल्ला झाल्यास कसा सामना करावा, यासाठी पोलीस विभाग तालीम करीत होते. पण ते विभागाच्याच अंगलटी आले. 

पोलिस विभागाकडून शारदा चौक, यवतमाळ येथे आयोजित मॉक ड्रिल घेण्यात आले. यात एक गंभीर घटना घडली. 29 ऑगस्टच्या संध्याकाळी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे शस्त्रातून छर्रा सदृष्य गोळी उडाली. आणि थेट एका तरुणाच्या डोळ्याजवळ जाऊन फुटली. त्यामुळे युवक गंभीर जखमी झाला. जखमी युवकाचे नाव शाहरुख अली तसव्वूर अली आहे. तो नवाबपुरा यवतमाळ येथील रहिवासी आहे. पोलीस विभागाकडून यवतमाळ येथील शारदा चौकात गर्दीच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या माक ड्रिलमध्ये ही घटना घडली.

नागपूरला हलविले

युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यांनी शहरातील संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगितले. यानंतर संजीवनी हाॅस्पीटल येथेही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला तत्काळ नागपूरला हलविण्यात आले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे युवकाला एक डोळा गमावण्याची स्थिती आली आहे. युवकाच्या उपचाराची जबाबदारी पोलिसां मात्र, युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा उजवा डोळा कायमचा गमवावा लागू शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पोलिसांचा निष्काळजीपणा

पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अनियंत्रित मोर्चांच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शारदा चौकात हे प्रशिक्षण घेतले. मात्र, या प्रक्रियेत झालेला निष्काळजीपणा पोलिसांच्या अंगलट आला आहे. स्थानिक नागरिकांपैकी काहींना मॉक ड्रिलमध्ये सहभागी करून घेतले होते. शाहरुख अली हा युवक देखील तेथे पोलिसांची कवायद बघत होता. युवकाच्या कुटुंबाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची मागणी केली होती. परंतु त्यांना तक्रार नोंदवण्यास मज्जाव करण्यात आला.

Assembly Elections : डॉक्टरांना व्हायचेय आमदार!

हालाखीची परिस्थिती

जखमी शाहरुख अलीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्या कुटुंबाचे पालन-पोषण तो एकटाच करतो. तीन लहान मुली, पत्नी आणि आई असे त्याचे कुटुंब आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शाहरुखला न्याय मिळावा अशी मागणी कुटुंबाने पोलिस विभागाकडे केली आहे. कुटुंबीयांचे पालन पोषण कोण करणार, असा प्रश्न त्याच्या समोर उपस्थित झाला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!