NCP : कोण सोडून जात आहे, कोण राहात आहे याचा विचार आपण करीत नाही. कोणी जात असले तरी आपण खंबीर आहे. ज्या लोकांना आपण विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे, ते लोक सोडून जात आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही, असे रोखठोक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महायुतीच्यावतीने बुधवारी (16 ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. तीनही नेत्यांनी यावेळी महायुतीच्या कामाचा लेखाजोखा मांडला.
महायुती मधील तीनही नेत्यांनी सरकारचे रिपोर्ट कार्ड जनतेपुढे सादर केले. तीनही नेत्यांना आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याबद्दल विचारण्यात आलं. विशेषत: सगळ्यांचेच प्रश्न अजित पवार यांच्या भोवती होते. पक्षातील एक एक आमदार सोडून चालले, असं पत्रकारांनी पवारांनी विचारलं. त्यावर दादांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. काळजी नका करू. मी खंबीर आहे, असं ते म्हणाले. आपण काही लोकांना उमेदवारी द्यायची नाही, असं ठरविलं आहे. त्यामुळे इकडे काहीच होत नसल्यानं ही मंडळी दुसरीकडं जात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला.
विरोधकांमध्ये भीती
लाडकी बहीण योनजेमुळे विरोधक घाबरले आहेत. योजनेची अंमलबजावणी होणारच नाही, असं विरोधकांनी सांगितलं. महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले. त्यानंतर पैसेच मिळणार नाही, असा कांगावा विरोधकांनी केला. महिलांच्या खात्यात पैसे मिळणे सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता महिलांना पाच महिन्यांचे मिळून साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. या याजोनेसाठी सुरुवातीला 10 हजार कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. आता एकूण 45 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं पवार यांनी सांगितलं.
Assembly Election : काळ्या पैशाच्या वापराची करता येणार तक्रार
रिपोर्ट कार्ड जनतेसमोर
महाराष्ट्रात गेले दीड वर्षे महायुती काम करत आहे. त्यामुळे आता आपल्या कामाचं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर करण्याची वेळ आल्याचंही तीनही नेत्यांनी सांगितलं. सातत्यानं आरोप होत आहे. तिजोरी रिकामी केली. राज्य कर्जबाजारी झाले आहे. त्यामुळे यासंदभ्र्ज्ञात अतिशय जबाबदारीने बोलणार असल्याचे पवार म्हणाले. अत्यंत विचारपूर्वक योजना सुरू केल्या आहेत. योजना सुरू झाल्यानंतर टिंगलबाजी करण्यात आली. पण महिला समाधानी असल्याचा आनंद झाल्याचे अजित पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पण विरोधक निवडणुकीला झालेल्या विलंबाबद्दलही सरकारला कोसत आहेत. सर्व निवडणूक आयोगाच्या हातात असतं, असंही पवार म्हणाले.