महाराष्ट्र

NCP : राष्ट्रवादीच्या या आमदाराने मागितले 500 कोटी 

Buldhana : आमदार मनोज कायंदेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक!

Manoj Kayande : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे माँ जिजाऊंचे माहेर घर. या ऐतिहासिक शहराच्या विकास आराखड्याला 500 कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा. शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, यांसह इतर मागण्या यावेळी पुढे आल्या. सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातुन प्रथमच सदनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी आज (19 डिसेंबर) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या मागण्या मांडल्या. मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर त्यांनी या अधिवेशनात जोरदार आवाज उठवला.

आपल्या पहिल्याच परंतु घणाघाती भाषणात आमदार मनोज कायंदे यांनी विविध मागण्या विधिमंडळात मांडल्या. त्यात बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या सिंदखेडराजा विकास आराखड्याला 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील मागील वर्षीचा थकीत पीकविमा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा, असेही ते म्हणाले.

बैठक

बुलढाणा जिल्ह्यातील मागील वर्षीचे ठिंबक, तुषार व शेती अवजारे यांचे थकीत अनुदान त्वरित देऊन नवीन शेती अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती द्यावी. समृद्धी महामार्गालगत नवनगरे व स्मार्ट सिटी विकासाला चालना देण्यासाठी ठोस पावले उचलावी. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात नवीन बस डेपोची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवीन बस डेपोला मंजुरी द्यावी. लवकरच मतदार संघात नवीन बस डेपोची निर्मिती करावी. बर्‍याच दिवसांपासून बंद पडलेला मतदारसंघातील जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीड सुरू करण्याच्या संदर्भात मुंबई येथे बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली.

या सर्व मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने लवकरच मुंबई येथे जिजामाता सहकारी साखर कारखान्याबात बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याचेही ते म्हणाले. विकासापासून कोसो दूर असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आपण कायम कटिबध्द आहो, असे प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार कायंदे म्हणाले.

Ambadas Danve : राज्याच्या हितासाठी संघर्षाची नव्हे तर सहकार्याची भूमिका !

..अन् कायंदे झाले आमदार 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी सामना पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, महायुतीतील शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांच्यात चुरशीची लढत झाली. सतत पाच वेळा म्हणजेच मागील 25 वर्षांपासून आमदार राहिलेले आणि त्याच माध्यमातून मंत्रिपदे भोगलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावून मनोज कायंदे यांनी शिंगणेंना पराभूत केले, हे विशेष.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!