प्रशासन

Washim : काय सांगता! पूजा खेडकरांना मानसिक आजार?

IAS Pooja Khedkar   :  चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

Washim : भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक सदस्यीय समिती नेमली आहे. कर्मिक मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. पूजा खेडकर या 2023 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांच्यावर गैरवर्तणूक तसंच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप आहे. याच संदर्भात ही समिती चौकशी करणार असून दोन आठवड्यात अहवाल आठवड्यात सादर करणार आहे. 

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अधिकारांचा गैरवापर केल्यामुळे राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. इतकंच नाही तर यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी आपल्याला दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. दरम्यान, या आरोपाची चौकशी करण्याठी आता केंद्र सरकारने एक सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या त्या वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्यावर आहेत.

पूजा खेडकर यांनी यूपीएससीकडे सादर केलेल्या दृष्टीदोष आणि मानसिक आजारासंदर्भातील प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. यासाठी एक सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. या समितीला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. खेडकर यांनी दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्राचा वापर यूपीएससी परीक्षेत सूट मिळवण्यासाठी केला होता. या परीक्षेत कमी मार्क मिळूनही त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांना देशभरातून ८४१ क्रमांक मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध करण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या हे विशेष.

काही दिवसांनी पूजा खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान दिले होते. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल आला. मात्र काही काळाने त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती झाली. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

गैरवर्तनामुळे बदली

पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचं प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच स्वतंत्र कक्ष, वाहन, निवासी सुविधा अशा मागण्या केल्या.

Aadhaar Card : कंगनाचं फर्मान!

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना यासंदर्भात अहवाल पाठवला होता. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!