NDA : लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करीत ही माहिती दिली आहे. 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित केला आहे. तर याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादली. भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता, असं गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना रंगला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांकडून भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, असे आरोप करण्यात आले. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. एनडीएला बहुमत मिळाले..आता तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले आहेत. दरम्यान तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारने मोठा निर्णय घेत 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित केला आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर अधिसूचना पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.
गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी अधिसूचना पोस्ट करीत. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल. असं म्हटलं आहे.
विरोधकांकडून टीकास्त्र!
केंद्र सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता यावरून पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत.
Legislative Council : डॉ. परिणय फुकेंच्या रूपाने ओबीसींना पुन्हा मिळाला आवाज !
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही या निर्णायावरून केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आणीबाणी संदर्भातील निर्णयावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. देशात खरी आणीबाणी ही नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लागू झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.