प्रशासन

Lok Sabha Election : टेन्शन घेऊ नका…तुम्ही केलेले मतदान एकदम सुरक्षित !

Collectors Assurance : ही आहे जिल्हाधिकाऱ्यांची गॅरंटी !

Jalgaon, Raver constituency : जळगाव आणि रावेर मतदारसंघातील ईव्हीएम मशीन राज्य वखार महामंडळाच्या गोदामाच्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. गोदाम परिसरात सीसीटीव्ही प्रणालीसह केंद्रीय जवान आणि स्थानिक पोलिसांचा 24 तास पहारा आहे. त्यामुळे तुम्ही केलेले मतदान सुरक्षित आहे. काळजीचे काही कारण नाही असा भरवसा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी जळगाव आणि रावेर मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या दोन्ही स्ट्रॉंग रुम, स्थानिक प्रशासनाने राबविलेल्या निवडणूक प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले होते.

मतमोजणी दरम्यान प्रतिबंध

4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी गोदाम परिसरात जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच संशयित हालचालींवरही बारकाईने लक्ष दिले जात आहे. या परिसरात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच स्ट्रॉंग रूमला प्रत्येकी सहा कुलूपे लावण्यात आली आहेत. दोन्ही मतदारसंघातील यंत्रे राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

जिल्हाधिकाऱ्यांकडूनही पाहणी

या व्यतिरिक्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दररोज सायंकाळी गोदाम परिसरात अचानक भेटी देऊन बंदोबस्ताची पाहणी करतात. तसेच उमेदवार किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही तिथल्या स्थितीविषयी माहिती देऊन सुरक्षिततेचा विश्वास देतात.

21 लाख मतदारांनी बजावला हक्क

जळगाव आणि रावेरमधील 21 लाख 44 हजार 729 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2019 मध्ये 19 लाख 90 हजार 377 मतदारांनी हक्क बजावला होता. त्या तुलनेत 1 लाख 57 हजार 360 मतदारांनी यंदा भर टाकली आहे

Dombiwali Midc Blast : डोंबिवलीतील घटना वेदनादायक : देवेंद्र फडणवीस

स्ट्राँग रूम परिसरात कलम 144 लागू

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून सुरुवात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर विदर्भात जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षातील दिग्गजांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साद घातली आहे. येत्या 4 जूनला मतदारांचा अंतिम कौल कुणाच्या दिशेने असेल हे स्पष्ट होणार आहे. सध्या सर्व मतदारांचे मत ज्या ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले. त्या सर्व मशीन स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.

 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!