अभिजीत घोरमारे
Congress Convention : 23 मे रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्हा दौरा आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आहे. दरम्यान पटोले यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने मुस्लिमांचे ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. 2010 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम जातींना ओबीसी प्रवर्गात दर्जा दिला होता. मात्र, आता कोलकाता उच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास आरक्षणाचा तिढा सुटेल.
पटोले म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करावी.त्या आधारावर जातीनिहाय जनगणना झाली तर प्रश्न सुटु शकतात. हा विषय त्या राज्याचा आहे. त्यामुळे तेथील राज्यकर्ते न्याय मागायला कुठे पण जाऊ शकतात. जेव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येइल तेव्हा सर्व प्रश्न निकाली निघतील.
Delhi Metro : दिल्ली मेट्रोने प्रवास करताना दिसले राहुल गांधी, फोटो व्हायरल
राज्यात पाणी टंचाई, चारा टंचाई
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई आहे. पण ही सरकार जनतेच्या प्रश्नासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करत आहे. लोकांच्या दारोदारी मतांसाठी फिरणाऱ्या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आचार संहिता का लागते. हा खरा प्रश्न आहे. राज्यात साडे तीन हजार पाण्याचे टँकर आहेत. पण त्यांनाही आचार संहितेच्या कारणावरून ब्रेक लावला आहे. सरकार जनतेच्या प्रश्नासाठी गंभीर नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवले नाही तर काँग्रेस राज्यभर आंदोलन असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.ते भंडाऱ्यात बोलत होते.