देश / विदेश

Delhi Metro : दिल्ली मेट्रोने प्रवास करताना दिसले राहुल गांधी, फोटो व्हायरल

Rahul Gandhi : संवाद साधला..प्रचारासाठी निघाले

Congress : भारतातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव आता संपत आला आहे. पाच टप्प्यातील निवडणुका संपल्या. आगामी दोन टप्प्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्नांत 

दिल्लीत सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे अंतिम दोन टप्पे बाकी आहेत. त्याच दरम्यान प्रचार सभांची रणधुमाळी सुरू आहे. राहुल गांधी यांनी नुकतीच दिल्लीत प्रचार सभा घेतली. त्यानंतर प्रचारसभा आटपून ते मेट्रोने प्रवास करताना दिसले.राहुल गांधी यांचा मेट्रो प्रवास करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना राहुल गांधींनी सर्वसामान्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. राहुल गांधी दिल्ली मेट्रोतून मंगोलपुरी येथे होणाऱ्या रॅलीसाठी जात होते.  काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारही त्यांच्यासोबत प्रवास करत होते. दिल्लीत 25 मे रोजी मतदान होत आहे.राहुल गांधींनी प्रचारसभेदरम्यान देखील सेल्फी घेतला आहे. त्यांची भारत जोडो यात्रा यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होणार का ते पाहावं लागणार आहे.

1 जुन रोजी मतदान

सुलतानपूर, प्रतापगड, फुलपूर, प्रयागराज, आंबेडकरनगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीरनगर, लालगंज, आझमगढ, जौनपूर, फिश सिटी, भदोही येथे सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार

Prashant Kishor : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात देशात मोठे बदल घडतील

पंजाबमधील सर्व 13 लोकसभेच्या जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे, सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात होइल. महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, वंशगाव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, रॉबर्टसगंज येथे मतदान होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!