OBC Student: ओबीसी महिला सेवा संघाने सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजना कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 10 डिसेंबर 2023 ला काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले आधार योजना कार्यान्वित करा, अशी मागणी ओबीसी महिला सेवा संघाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने 2023 च्या परिपत्रकात सावित्रीबाई फुले आधार योजना लाभार्थी विद्यार्थी निवडीचे निकष स्वतंत्र आदेशाद्वारे कळविण्यात येईल, असे नमूद केले होते. परंतु, शासनाला त्याचा विसर पडला आहे. आदेश निघाल्याशिवाय 21 हजार 600 ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांना आधार योजनेचा लाभ मिळू शकत नाही. या योजनेसाठी राज्य शासनाने 100 कोटींचा निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर केला आहे. हे विशेष. परंतु ओबीसी लोकप्रतिनिधी पाठपुरावा का करीत नाहीत, असा प्रश्न ओबीसी महिला सेवा संघाने विचारला आहे. ओबीसीचे प्रश्न तातडीने सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Nana Patole : सांगलीतील काँग्रेसच्या स्नेहभोजनावरून नाना पटोलेंचे घुमजाव
नव्या सत्रात सुरू होणार ओबीसी वसतिगृह
नवीन शैक्षणिक सत्रात शासकीय वसतिगृह सुरू होणार आहे. सध्या भाड्याच्या इमारतीत वसतिगृह सुरू होणार आहे. यासाठी मुला-मुलीसाठी दोन स्वतंत्र इमारतीचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती समाजकल्याण उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी ‘द लोकहित’ला दिली आहे.
… अन्यथा जाब विचारू
दरम्यान स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, हा यक्ष प्रश्न कायम आहे. लोकप्रतिनिधींनी यातून बोध घ्यावा. अन्यथा, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही ओबीसी महिला सेवा संघाने दिला आहे.