प्रशासन

Illegal Moneylenders : अवैध सावकारांविरुद्ध पुन्हा सापळा

Sub Registrar : सहकार विभागाकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त!

जयेश गावंडे

Akola District काही दिवसांपूर्वी अकोला शहरात तीन ठिकाणी सहकार विभागाच्या पथकाने धाडी टाकत आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. आता पुन्हा तक्रारीवरून सहकार विभागाच्या पथकाने आज शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. याची सखोल चौकशी केल्यानंतर अवैध सावकारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शेतीचा खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी शेतीसाठी आर्थिक जुळवाजुळव करताना दिसत आहे. बँकांकडून कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकाराचे दार ठोठवावे लागते. अवैध सावकार शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा व्याज आकारून कर्ज देतात. अशातच सहकार विभाग सक्रिय झाला असून गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारी विरोधात शोध मोहीम राबविण्यात येत आहे. अकोला शहरात आज पुन्हा सहकार विभागाच्या पथकाने शोध मोहीम राबविली आहे. सहकार विभागाला मिळालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र,ही मोहीम आणखी व्यापक करण्याची गरज आहे.

तीन ठिकाणी कारवाई

अकोला शहरात आज तीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. शहरातील टिळक रोड, रतनलाल प्लॉट, संघवी वाडी भागात तीन पथकाव्दारे शोध मोहिम राबविण्यात आली. या धाडीदरम्यान रजिस्टर/नोंदवही/डायरी-5, पावती पुस्तक-2, सी.सी.टी.व्ही. रेकॉर्डर-01 इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त होता. धाडीमधील जप्त दस्तऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Buldhana News : न्याय मिळाला नसल्याने ठाणेदाराला ओवाळण्याचा प्रयत्न !

सहकार विभागाच्या पथकात पथक प्रमुख ए. एम. भाकरे, डी. डब्ल्यू, सिरसाट, आर.आर. घोळके यांचा समावेश होता. तर जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, नागरी कर्मचारी पतसंस्था कर्मचारी पंच म्हणून तसेच पोलिस विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग होता.अवैध सावकारी संबंधी तक्रार करण्याचे आवाहन डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!