डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे मुलाचा पाय निकामी होण्याच्या मार्गावर आहे. याची तक्रार पोलिसात दिल्यानंतरही मागील तीन महिन्यांपासून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुले संतप्त झालेल्या महिलेने आज (ता. 22) बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस स्टेशनमधील ठाणेदाराच्या केबिनमध्ये पूजेच्या ताटासह पोहोचून ठाणेदाराची ओवाळणी करण्याचा प्रयत्न केला.
महिला ठाणेदारांच्या केबिनमध्ये जाताच पोलिस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पुनम भारंबे महिलेचा १६ वर्षीय मुलगा दुर्गेश आहे. त्याच्या डाव्या पायातील गुडघ्याची वाटी फ्रॅक्चर झाली होती. त्यावर मलकापूर येथील डॉ. राहुल चोपडे यांनी मांडीपासून तळपायापर्यंत पक्के प्लास्टर केले. यानंतर दुर्गेश सलग दोन दिवस मरण यातना सहन करत होता.
अवघ्या दोन दिवसांत दुर्गेशचा पाय संवेदनहिन झाल्याने घाबरून आई-वडिलांनी बऱ्हाणपूर येथील डॉ. सुभोध बोरले यांच्याकडे उपचाराकरीता नेले. चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मुलाचे कधीही भरून न निघणारे पायाचे नुकसान झाल्याचे समजले. यांनतर मलकापूर येथील पुनम भारंबे यांनी डॉ. राहुल चोपडे यांच्या विरुद्ध 30 मार्च 2024 रोजी मुलावर चुकीचा उपचार केल्याने कायमच्या आलेल्या अपंगत्वासंदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.
3 महिने उलटूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरवर कारवाई न केल्याने माझा संविधनिक कायदेशीर अधिकार डावल्याचा आरोप करीत पिढीत दुर्गेशची आई पुनम भारंबे यांनी केला. गांधीगिरीच्या माध्यमातून आज त्यांनी पोलीस स्टेशन परिसराला खडबडून जागे केले. पुनम भारंबे ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती करण्याचा बेत आखून चक्क ठाणेदाराच्या केबिनमध्ये पोहोचल्या सहाजिकाच ठाणेदार हडबडले. आरती ओवाळण्यास नाकार त्यांनी यावेळी केला.
हा प्रकार झाल्यानंतर दोन दिवसांत कारवाई करतो, असे म्हणून पीडित मातेला आश्वासन देऊन प्रकरण शांत केले. त्यावेळी दिपक चांभारे पाटील मलकापूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख, रोहन सागडे, युवासेना शहर प्रमुख, राजेंद्र काजळे, शिवसेना विभाग प्रमुख, तुषार पानट, युवासेना शहर उपप्रमुख राणे उपस्थित होते.
शिवसेना गप्प बसणार नाही..
गुन्हा नोंदविण्याचा सांविधनिक अधिकार डावलून पोलिसांनी कर्तव्याचे पालन केले न्ही. गत 3 महिन्यांपासून पीडित माता मलकापूर पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवत होती. तरीसुद्धा पोलिस प्रशासनाला पाझर फुटला नसल्याने मातेला न्याय्य देण्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी मातेसह मलकापूरचे ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती ओवाळण्यासाठी गेलो. यानंतर कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्यापासून कुणीही अडवणूक केल्यास मलकापूर शिवसेना गप्प बसणार नाही, असे दिपक चांभारे पाटील यांनी सांगितले.
न्याय मिळत नसल्याने केली गांधीगिरी..
पहिल्याच दिवशी मांडीपासुन तळपायापर्यंत पक्के प्लॅस्टर केल्याने पायात रक्त गोठून पाय बधीर होत गेला. वेदना असह्य होत होत्या. एकंदरित डॉ. राहूल चोपडे यांच्या दुर्लक्षामुळे पोटच्या मुलाच्या पायाला कायमचे अपंगत्व येण्याची वेळ आली. तरीसुद्धा मला न्याय देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते. म्हणून मला या निर्णयापत यावे लागले. अजूनही न्याय न मिळाल्यास मी मुलांसह पोलिस स्टेशन आवारात उपोषणाला बसेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पूनम भारंबे यांनी दिला आहे.