प्रशासन

ACB Trap : एक वर्षानंतर एसीबीने केला तिसरा आरोपी ‘ट्रॅप’

Panchayat Samiti : 2023 मधील कुक्कुट पालन शेडचे लाच प्रकरण.

अभिजीत घोरमारे

Gondia District : 2023 मधील एका लाच प्रकरणात मुख्य आरोपीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ट्रॅप लावला आणि त्याला अलगद पकडले. हा आरोपी पशुधन पर्यवेक्षक तेजराम रहांगडाले आहे. यापूर्वी त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

ऑगस्ट 2023 मध्ये कुक्कुट पालनाकरिता उभारण्यात आलेल्या शेडचे देयक काढण्यासाठी 11 हजार रूपयांच्या लाचेची मागणी रहांगडाले कडून करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनंतर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या आरोपींच्या माध्यमातून गोंदिया पंचायत समितीमध्ये कार्यरत पशुधन पर्यवेक्षक तेजराम रहांगडाले यांनी लाच मागितली होती.

रहांगडाले यानेच लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने काल (ता. 21) गोंदिया लाचलुचपत विभागाने त्याच प्रकरणात आरोपी तेजराम रहांगडाले याला अटक केली आहे. पशुसंवर्धन विभाग

गोंदिया पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेतंर्गत तक्रारकर्त्याला कुक्कुट पालनाचे शेड उभारण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले. दरम्यान 1 लाख रूपयाचा धनादेश काढण्यासाठी 11 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.

तडजोडी अंती 10 हजार रूपये देण्याचे ठरले. 4 ऑगस्ट 2023 रोजी आरोपी पशुधन विकास अधिकारी जयप्रकाश करवाडे (39) व खासगी इसम महेंद्र घरडे या याच्या माध्यमातून लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. दोन्ही आरोपीविरूध्द गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Finance Sector : महिला दातेच्या पावलावर ‘रंगनाथ’ची वाटचाल !

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक उमाकांत उगले यांनी केला. तपासादरम्यान तिसरा मुख्य आरोपी पशुधन पर्यवेक्षक तेजराम रहांगडाले देखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यावरून काल गोंदिया लाचलुचपत विभागाने आरोपी तेजराम रहांगडाले याला अटक केली. या प्रकरणात आरोपींची संख्या तीन झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!