महाराष्ट्र

CM Eknath Shinde : आचारसंहितेत रखडली ‘मुख्यमंत्री माझी शाळा…’ 

School Campaign : अभियानातील पारितोषिक प्राप्त शाळांसाठी निधी मिळाला आहे

जयेश गावंडे

‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ अभियान मूल्यांकनाच्या आधारे जिल्ह्यातील 42 शाळांना तालुकास्तरीय पारितोषिकासाठी निवडण्यात आले आहे. यासोबतच जिल्हास्तरावर सहा शाळांची पुरस्काराकरिता निवड झाली आहे. मात्र आचारसंहितेमुळे हे पारितोषिक वितरण रखडलेले आहे. निवडणुक आचारसंहितेचा कालावधी संपल्यावर मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा अभियानातील पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा अभियान राबविण्यात आले होते. हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी\पर्यंत शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात आले. 16 फेब्रुवारीपासून तालुकास्तर जिल्हास्तर, मनपास्तर, विभागस्तर तसेच राज्यस्तरावर मूल्यांकन करण्यात आले. प्रत्येक स्तरावर तीन शाळांची निवड करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील कोणतीही शाळा राज्यस्तरावर पारितोषकाकरिता घोषित झाली नाही. मात्र विभाग स्तरावर जिल्ह्यातील दोन शाळांना प्रत्येकी 11 लाखांचे तृतीय पारितोषिक राज्य स्तरावर आयोजित कार्यक्रमात मिळाले आहे.

या अभियानातील अकोला जिल्हास्तरावर सहा शाळांची निवड करण्यात आली आहे. मूल्यांकनाच्या आधारे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तीन व खाजगी तीन शाळांना प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कारासाठी निवडण्यात आले. यासोबतच तालुकास्तरावर 42 शाळांना पारितोषिक मिळणार आहे. मूल्यांकनाच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील तीन खाजगी शाळा व तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. अशा प्रत्येक तालुका स्तरावरील सहा शाळांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषकांसाठी निवडण्यात आले आहे.

High Court : …तर सुनील केदार लढतील आगामी विधानसभा निवडणूक !

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील पारितोषकांसाठी निवड झालेल्या शाळांसाठी पारितोषकाचा निधी प्राप्त झाला नव्हता. आता निधी प्राप्त झाला असून लोकसभा निवडणूक आचारसंहिता सध्या सुरू आहे. त्यामुळे आचारसंहितेचा कालावधी संपल्यावर पारितोषिक विचारणाच्या कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता दिसून येत आहे.

पारितोषकांचा निधी मिळाला.. 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील पारितोषिक प्राप्त शाळांसाठी निधी मिळाला आहे. पारितोषिक प्राप्त जिल्हास्तरावर व तालुका स्तरावरील शाळांसाठी 1 कोटी 22 लाखांचा निधी मिळाल्याचे जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी सांगितले. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमात माझी शाळा सुंदर शाळा योजनेचे पारितोषिकासाठी निवड झालेल्या शाळांचा गौरव करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!