Political war : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. पटोले म्हणाले, रावणही सीताजींचे अपहरण करण्यासाठी भगवा परिधान करून आला होता. आदित्यनाथ स्वत:ला संत म्हणवून घेतात आणि भगवे कपडे घालतात. भगवा परिधान करून चुकीच्या धोरणांचे समर्थन करणे चुकीचे आहे.
देशात चीनच्या कथित अतिक्रमणासारख्या प्रकरणांवर पटोले यांनी मुख्यमंत्री योगींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारत मातेला शत्रू देश काबीज करत आहे, मग योगी आदित्यनाथ का बोलत नाहीत? मनमोहन सिंग सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला होता. या अंतर्गत मोदी सरकार गेल्या दहा वर्षांपासून धान्य वाटप करत आहे. चीनमधून प्लास्टिकचा तांदूळ आणून त्यात भेसळ करून लोकांमध्ये वाटप करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प का आहेत? अशी टीका नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली आहे.
योगी म्हणाले, काँग्रेस रामविरोधी
जेव्हा आपण 400 जागां बद्दल बोलतो तेव्हा काँग्रेसला चक्कर येऊ लागते, कारण काँग्रेस स्वतः 400 जागांवर निवडणूक लढवत नाही. काँग्रेस रामविरोधी आहे. आम्ही काँग्रेसला सांगतो इटलीतच राम मंदिर बांधा. काँग्रेस विध्वंसाच्या दिशेने चालली आहे आणि बुद्धी विरोधी पक्षही राम मंदिराला विरोध करत आहेत.
Vibhav Kumar Case : दिल्ली पोलिस विभव कुमार यांना मुंबईत घेऊन जाणार
आता उत्तर प्रदेशातील लोकांनी रस्त्यावर नमाज अदा करणे बंद केले आहे आणि मशिदींमधून लाऊडस्पीकरही खाली येऊ लागले आहेत. देशावर कोणतेही संकट आल्यावर राहुल गांधी हेच देश सोडतात. त्यांनी नेहमीच देशाला संकट दिले, मग ते नक्षल संकट असो वा दहशतवाद, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.