Mumbai Constituency : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केले आहे. पराभव समोर दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.
निवडणूक आयोग एकीकडे मतदानाचा टक्का वाढीसाठी आवाहन करते परंतु प्रत्यक्षात मतदान संथगतीने सुरू राहते. मतदारांना नावे शोधावी लागली, ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला. मतदान केंद्रावर सोय नव्हती असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
Maharashtra Lok Sabha Election : मतदार यादीतून नावे गायब, कोणाला फटका
फडणवीस यांनी मुद्दे खोडून काढले
मुंबई मध्ये मतदानावरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. उलट त्यांना पराभव दिस लागल्याने वाटेल तसे बोलत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे हे द्योतक असल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.