Political war : संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी याबाबत शुक्रवारी फिर्याद दिली याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावर कारवाईबाबत कोतवाली पोलिसांना प्रस्ताव देण्यात आल होता. त्यानुसार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 171 (क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Doctor Suspended : वैद्यकीय पेशाला कलंक लावणारा डॉक्टर निलंबित !
पंतप्रधान यांचा एकेरी उल्लेख
आपल्याला इतिहासामध्य जावं लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता, तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण?” राउत म्हणाले